निलेश बंगाले, वर्धा:
Wardha Dog Attack: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी झाल्याच्या, चिमुकल्यांचा जीव गेल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या या दहशतीमुळे घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अशीच काळीज पिळवटून टाकणारी घटना वर्ध्यामधून समोर आली आहे. वर्ध्यात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
Chhatrapati Sambhajinagar: पोलीस भरतीचे स्वप्न धुळीला! सराव करताना तरुणावर काळाचा घाला
कुत्र्याचा हल्ला, चिमुकल्याचा मृत्यू
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वर्ध्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धवल गजानन गुल्हाने (वय आठ वर्षे) असे मृत मुलाचे नाव नाव आहे. चिमुकल्याच्या मृत्यूने आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आर्वीमध्ये भटक्या कुत्र्याने धुमाकूळ घातला होता. या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात धवल गुल्हाने हा आठ वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या उपचारासाठी त्याला अनेक ठिकाणी हलविले परंतु शेवटी ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले व त्याची प्राणज्योत मावळली.त्यामुळे आता भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी जोर धरू लागली आहे.
(नक्की वाचा- Pune News: पुणेकरांवर येणार पाणी संकट! पुणे शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा, काय आहे प्रकरण?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world