MLA Sanjay Gaikwad Rada : सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे राज्यभरातील आमदार मुंबईतील आमदार निवासात (Mumbai MLA Residence) वास्तव्याला आहे. येथे निकृष्ट जेवणावरुन शिंदे गटाच्या एका आमदारांनी आमदार निवासस्थानी राडा घातल्याचं समोर आलं. जेवण चांगलं नव्हतं म्हणून आमदारांनी कँटिन चालकास बेदम मारहाण केल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकाशवाणी आमदार निवासात निकृष्ट जेवण मिळत असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांच्याकडून (Shinde Sena MLA Violence) करण्यात आला आहे. संजय गायकवाड यांनी रूम नंबर 107 वर ऑर्डर दिली असता अत्यंत निकृष्ट दर्जाची डाळ देण्यात आली, असा त्यांचा आरोप आहे.
नक्की वाचा - Maharashtra Assembly Session: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना डिवचलं, पाहा सर्व VIDEO
ती डाळ खाल्ल्यावर पोटात मळमळू लागलं होतं. यानंतर आमदारांनी कँटिनमध्ये राडा केला. आमदारांनी कँटिन चालकाला बेदम मारहाण केली.