Raj Thackeray: 'निवडणुका घेऊनच दाखवा..', राज ठाकरेंचे चॅलेंज, 'लाव रे तो VIDEO'चा बॉम्ब फोडला

अनेकांना मी काय म्हणतोय याचं गांभीर्य समजलं नाही, पण जेव्हा सर्वांच्या दरवाज्यावर 'टकटक' व्हायला लागली, तेव्हा लोकांना याची जाणीव झाली, असं राज ठाकरे म्हणाले. 

जाहिरात
Read Time: 3 mins

MNS Chief Raj Thackeray Speech: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोर्चेबांधणी सुरु केली असून आज  गोरेगाव नेस्को येथे मनसेचा मेळावा पार पडला. नसे मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख, उपशाखाध्यक्ष तसेच मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओचा बॉम्ब फोडत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. जोपर्यंत याद्या स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा, असा थेट इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला. 

काय म्हणाले राज ठाकरे?

आज तसं काही नव्हतं म्हणून हा मेळावा घेण्यात आला, पण या तातडीच्या मेळाव्याला कारण आहे. निवडणूक जेव्हा लागेल, तेव्हा आपण ठरवू; पण सध्या जो गोंधळ सुरू आहे, तो आताचा नाही, तर गेले काही वर्षांचा आहे. २०१६-१७ मध्ये मी याविरोधात आवाज उचलला होता, त्यावेळी सर्वपक्षीय पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी अनेकांना मी काय म्हणतोय याचं गांभीर्य समजलं नाही, पण जेव्हा सर्वांच्या दरवाज्यावर 'टकटक' व्हायला लागली, तेव्हा लोकांना याची जाणीव झाली, असं राज ठाकरे म्हणाले. 

Heavy Rain: 33 लाख शेतकऱ्यांना ३ हजार 258 कोटीची मदत, यादीत तुमचा जिल्हा आहे का? लगेच चेक करा

 "२३२ एवढे आमदार निवडून आले, तरी महाराष्ट्रात सन्नाटा होता. मतदारही आवाक झाले, निवडून आलेले लोकही आवाक  झाले, त्यांनाही कळेना की ते कसे निवडून आले. अनेकदा म्हणतात गर्दी होते, पण मतात येत नाही. कसं येईल? कारण माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे की, महाराष्ट्रात ९६ लाख खोटे मतदार भरले आहेत, असा सर्वात मोठा खळबळजनक आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला. 

अशा निवडणुका होणार असतील, तर कशासाठी निवडणुका लढायच्या? तुम्ही मत द्या नाहीतर नका देऊ, कारण मॅच फिक्सिंग (Match Fixing) झालं आहे. ही कोणती लोकशाही?" असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला. आमदारांच्या याद्यांचे गणित 'फिक्स' (Fix) आहे. आम्ही निवडणूक आयोगावर (Election Commission) बोलतो, तेव्हा सत्ताधारी चिडतात. लागतंय ना कुठेतरी? आम्ही निवडणूक आयोगाला विचारलं, तर सत्ताधारी उत्तर देतात. 'शेण खाल्लं' म्हणून राग येतो. महाराष्ट्राला माहिती आहे की सत्ता कशी आली, असा टोलाही राज ठाकरेंनी लावला.

Pune News: पुण्यात ऐन दिवाळीत प्रवाशांची लूट, 400 ऐवजी 800 रुपये तिकीट! परिवहन मंत्री कधी लक्ष देणार?

पुन्हा एकदा लाव रे तो VIDEO 

यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडिओ (Video) उपस्थितांना ऐकवला. या व्हिडिओमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat Chief Minister) नरेंद्र मोदी हे निवडणूक आयोगावर टीका करताना दिसत होते. राज ठाकरे म्हणाले, "मी काय वेगळं बोलतोय? त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांचं ते भाषण होतं. आम्ही पण आता तेच सांगतोय की, निवडणूक आयोगाला तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात, सोबतच राज ठाकरेंनी पैठणचे आमदार विलास भुमरेंनी केलेल्या  २० हजार मतं बाहेरून आणली, या वक्तव्याचाही व्हिडिओ दाखवत जोरदार टीका केली. 

Advertisement

Topics mentioned in this article