Pune Municipal Corporation Election : मनसेची स्वबळाची तयारी, राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यादरम्यान मोठ्या फेरबदलाची शक्यता

पुणे महानगरपालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे 9 जून रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. 

जाहिरात
Read Time: 1 min

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली. पुण्यातील शहर कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. पुणे महानगरपालिकेतील सर्व जागांवर मनसे निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनसेकडून पुणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे 9 जून रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे सर्व पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत शहरातल्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होणार असून मनसे पुणे शहरातल्या संघटनेत मोठे फेरबदल करणार असल्याची माहिती आहे. मनसे पुण्यातील सर्व शाखाप्रमुख बदलणार असल्याचंही सांगितलं जात आहे. 

नक्की वाचा - MNS News : 'मी राज ठाकरेंची भक्ती केली, व्यापार नाही' कोकणातील मनसेच्या बड्या नेत्याची खदखद उघड!

लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं बिगुल वाजणार..
राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत आहेत. राज्य निवडणूक आयोगही तयारीला लागला आहे. येत्या काही महिन्यात या निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुका रखडल्या आहेत. 

Advertisement