पनवेल: पनवेल तालुक्यातील आजिवली येथील *‘नाईट रायडर लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार'*वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी रविवारी उशिरा रात्री धडक कारवाई करत हल्ला चढवला. या हल्ल्यात बारच्या काचा फोडण्यात आल्या, दरवाजांवर लाकडी काठ्यांनी प्रहार करण्यात आला, तसेच स्टाफला धमकावत बार बंद करण्याचा इशारा देण्यात आला. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vasai : माजी आयुक्तानंतर वसई विरारच्या आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर गुन्हा, घरावरील धाडीत खजिना जप्त!
घटना कशी घडली?
फिर्यादी रामाण्णा कळप्पा शेट्टी (५१), व्यवसाय हॉटेल चालक, रा. कल्पतरु सोसायटी, पनवेल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास ते आपल्या ‘नाईट रायडर' लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारमध्ये असताना अचानक 15-20 मनसे कार्यकर्त्यांचा जमाव बारसमोर आला.
मनसे महानगर प्रवक्ता योगेश चिल्ले, राहुल चव्हाण, संजय मुरकुटे, किरण गुरव, अक्षय हाके यांच्यासह जमलेल्या या कार्यकर्त्यांनी “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राजसाहेबांचा विजय असो, बार तोडा, बार फोडा” असे जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी हातातील दगड बारकडे फेकून काचांचे नुकसान केले. दरवाजे आणि बोर्डवर लाकडी काठ्यांनी प्रहार करण्यात आला.
Panvel MNS News: राज ठाकरेंचे भाषण, काही तासात मनसेचे 'खळ-खट्याक'; पनवेलमध्ये लेडीज बार फोडला
दहशत निर्माण, स्टाफला धमक्या
हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादी व बार स्टाफला धमकावत बार तत्काळ बंद करण्यास भाग पाडले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, बारच्या काचांचे आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी भा. न्या. सं. २०२३ अंतर्गत कलम 329(1), 189(2), 191(1)(2)(3), 324(5), 125, 352, 351(3), तसेच आयपीसी कलम 441, 143, 147, 148, 427, 336, 504, 506 नुसार गुन्हा क्रमांक २०२/२०२५ नोंदवला आहे. असून योगेश चिले सह आठ कार्यकर्त्यांना अटक केले असून त्यांना दुपारी पनवेल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.