Nashik News : बाळंतपणाला आलेल्या लेकीसह आईचा मृत्यू; मुक्तिधाम मंदिरासमोर घडली हृदयद्रावक घटना

नाशिकरोड येथील मुक्तीधाम मंदिरासमोर घडलेल्या या अपघाताने हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Nashik Accident : नाशिकमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. ट्रकचालकाच्या अपघातात मायलेकींचा हकनाक बळी गेला. धक्कादायक बाब म्हणजे शीतल बाळंतपणासाठी माहेरी आली होती. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत मायलेकींचा आणि शीतलच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे. या अपघानंतर केदारे यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

नेमकं काय घडलं?

नाशिकरोड येथील मुक्तीधाम मंदिरासमोर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून मालवाहतूक ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात रस्ता ओलांडणाऱ्या मायलेकीनाही ट्रकची धडक बसली आणि दोघी ट्रकच्या खाली चिरडल्या गेल्या. त्या दोघांनी तत्काळ  उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र काल जखमी सुनीता वाघमारे यांचा आणि शीतल केदारे या दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नक्की वाचा - Crime News : 'त्याला मारायचं नव्हतं', सीनियरची हत्या करणाऱ्या 8 वीच्या विद्यार्थ्याचं हादरवणारं इन्स्टा चॅट

शीतल केदारे या बाळंतपणासाठी माहेरी आल्या होत्या. त्या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिक रोड परिसरात असलेल्या अतिक्रमणाने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. नाशिक रोड पोलिसांकडून गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू आहे.

Topics mentioned in this article