MSRTC News: पर्यटकांसाठी खुशखबर! फक्त 110 रुपयात महाबळेश्वर सफर; 'लालपरी'ची भन्नाट ऑफर काय?

Mahabaleshwar Darshan Bus Service: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने पर्यकांसाठी 'महाबळेश्वर दर्शन' बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आता खिशाला झळ न बसता महाबळेश्वरच्या निसर्गाचा आनंद लुटणे सोपे झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mahabaleshwar Darshan Bus Service:  मान्सूनचे दमदार आगमन झालं असून पावसाचा जोर वाढला आहे. वरुणराजाच्या एन्ट्रीने पर्यटनस्थळांवर आता गर्दी वाढू लागली आहे. अशावेळी तुम्ही महाबळेश्वरला जाण्याचे नियोजन करत आहात पण स्वतःचे वाहन नाही? मग आता काळजीचे कारण नाही! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने पर्यकांसाठी 'महाबळेश्वर दर्शन' बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आता खिशाला झळ न बसता महाबळेश्वरच्या निसर्गाचा आनंद लुटणे सोपे झाले आहे.

Maharashtra Rain: राज्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस! 23 जिल्ह्यांना अलर्ट; कुठे कुठे बरसणार? वाचा हवामान अंदाज

'लालपरी'ने पाहा महाबळेश्वरचं सौंदर्य! 

​महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण असून, पर्यटकांची येथे वर्षभर वर्दळ असते. मात्र, स्वतःचे वाहन नसल्यास स्थानिक पातळीवर फिरण्यासाठी टॅक्सीचा खर्च पर्यटकांच्या खिशाला परवडणारा नसतो. ही अडचण ओळखून आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) पर्यकांसाठी 'महाबळेश्वर दर्शन' बस सेवा सुरू केली आहे.

Advertisement

ही बस सेवा पर्यटकांच्या सोयीसाठी अत्यंत किफायतशीर असून, अवघ्या ११० रुपयांमध्ये १५ प्रमुख पर्यटन स्थळे एकाच तिकिटात पाहता येणार आहेत. या बसचे नियोजन अत्यंत प्रभावी असून, रोज दुपारी २:३० वाजता महाबळेश्वर एसटी स्टँडवरून ही बस प्रवासाला सुरुवात करते. टॅक्सीच्या तुलनेत ही सेवा अत्यंत स्वस्त असल्याने पर्यटकांचा प्रवास अधिक सुसह्य झाला आहे.

फक्त 110 रुपयात 15 पॉईंट्स

​या बसद्वारे पर्यटकांना जुने महाबळेश्वर, पंचगंगा उगमस्थान, स्वयंभू शिवलिंग, कृष्णाई मंदिर, ऑर्थरसिट पॉईंट, कँसल रॉक पॉईंट, सावित्री पॉईंट, मार्जोरी पॉईंट, विंडो पॉईंट, टायगर स्प्रिंग, हंटिंग पॉईंट, इको पॉईंट, मालकम पॉईंट, स्ट्रॉबेरी गार्डन आणि सूर्यस्तासाठी प्रसिद्ध असलेला एलफिस्टन पॉईंट अशी १५ ठिकाणे पाहता येणार आहेत. 'न गाड्यांची कटकट, न टॅक्सीचा खर्च' अशा ब्रीदवाक्यासह सुरू केलेली ही लाल परीची सेवा पर्यटकांसाठी नक्कीच पर्वणी ठरणार आहे.

Ketan Agarwal Murder नवा ट्विस्ट: 'हत्येचा प्लान चेतनचाच' Vs 'मास्टरमाइंड सियाच' बचावासाठी आरोपींचा ड्रामा