
MSRTC Delivery Service: काळात घरबसल्या कोणतीही वस्तू घरबसल्या मागवण्यासाठी असंख्य खासगी कुरिअर सेवा देणाऱ्या कंपन्या उपलब्ध आहेत. राज्यामध्ये कोणत्याही भागातून कोणत्याही भागात वस्तूंची देवाण- घेवाण करता येते. या सेवा देणाऱ्या अनेक खासगी कंपन्या तुम्हाला माहित असतील पण महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसमधूनही कुरिअर सेवा होते हे तुम्हाला माहित आहे का? लालपरी मधूनही राज्यातल्या कोणत्याही कोपऱ्यातून कुठेही वस्तू मागवता येतात. काय आहे ही महाराष्ट्र परीवहन महामंडळाची सेवा? जाणून घ्या सविस्तर...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून अगदी स्वस्त दरात कुरीअर सेवा पुरवली जाते. आपल्या लाडक्या लालपरीमधून जवळपास 700 किलोपर्यंतचे कोणतेही सामान संपूर्ण महाराष्ट्रभर कुठेही पाठवू शकता. यासाठी जवळपास 400 हून अधिक डेपो महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित आहेत तर हजारो बसेसच्या माध्यमातून ही कुरीअरची सेवा पुरवली जाते.
यामध्ये आपण वस्तूंच्या स्वरुपातील मोठे सामान तर पाठवू शकतोच त्यासोबतच छोटे कार्ड, महत्त्वाची कागदपत्रेसुद्धा अगदी सुरक्षितपणे आणि वेळेत सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचवू शकता. या महास्पीड एमएसआरटीसीमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचाही वापर होतो. लेटेस्ट टेक्नोलॉजिचा वापर करुन तुम्ही तुमचे कुरिअर कुठे पोहोचले? कधीपर्यंत सांगितलेल्या ठिकाणी पोहोचेल? याच्या माहितीसीठी लाईव्ह लोकेशनही ट्रॅक करु शकता.
नक्की वाचा - CIDCO Lottery : सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती जाहीर, 25 लाखांपासून मिळणार स्वप्नांचं घर, अर्जाची अंतिम मुदत कधीपर्यंत?
यासाठी महाराष्ट्रभरात महास्पीडची 425 हून कार्यालये उभारण्यात आली आहेत तसेच एका मराठी उद्योजकाकडे हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आहे. या कंपनीकडून पार्सलसेवा वाहतूकीचे दर ठरविणे व इतर अनुषंगिक अधिकार खाजगी एजंटांना देण्यात आलेले आहेत. महामंडळांच्या सर्व प्रमुख बसस्थानकांवर पार्सल कार्यालये कार्यान्वित असून त्याद्वारे नागरिकांना सक्षम पार्सलसेवा पुरविण्यात येते.
नागरिकांना त्यांच्याकडील वस्तू / सामान एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जलदरित्या पाठविण्याकरिता एस.टी. महामंडळांच्या यंत्रणेचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्यास, महामंडळांसही अधिकचे उत्पन्न प्राप्त होते. ही बाब विचारात घेऊन सुरुवातीच्या कालावधीपासून प्रवासी वाहतूकीसमवेत पार्सल वाहतूक सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
नक्की वाचा - Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर, महाजन कुटुंबीयातील व्यक्तीकडूनच जमीन हडपण्याचा आरोप
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world