Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे हाल, रात्रभर करावा लागतोय बँकेबाहेर मुक्काम; कुठे घडला प्रकार?

नांदेड जिल्ह्यातील हदगाव या तालुक्याच्या शहरातील एस बी आय बँकेसमोर महिला उद्या सकाळी नंबर लागावा म्हणून रात्रीपासूनच बँकेसमोर नंबर लावून झोपत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

नांदेड: महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेचा ई केवायसी करणे अनिवार्य असल्याने महिलांची बँकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र बँकांमध्ये गर्दी होत असल्याने लाडक्या बहिणींची तारांबळ होत आहे. अशातच ही  ई केवायसी काढण्यासाठी महिलांना चक्क बँकेबाहेर रात्र काढावी लागत असल्याचा प्रकार नांदेडमधून समोर आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  ई- केवायसी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना रात्रीपासून बँकेबाहेर लाईन लावून झोपण्याची वेळ आलीये. नांदेड जिल्ह्यातील हदगाव या तालुक्याच्या शहरातील एस बी आय बँकेसमोर महिला उद्या सकाळी नंबर लागावा म्हणून रात्रीपासूनच बँकेसमोर नंबर लावून झोपत आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी बँकेचे केवायसी करणे अनिवार्य आहे.

शिवाय चालू बँक खाते असेल तरी दरवर्षी के वाय सी करणे अनिवार्य असते. पण ग्रामीण भागातील बँक खाते धारकांना ऑनलाईन के वाय सी प्रक्रिया करणे जमत नाही. त्यामुळे बँकेत येऊन के वाय सी करण्याशिवाय या खाते धारकांना पर्याय नाही. पण ग्रामीण भागातील बँका के वाय सी करण्यासाठी आठवड्यातील केवळ एक दिवस नेमून देत आहेत. हदगाव येथील एस बी आय बँकेत केवळ गुरुवार के वाय सी साठी नेमून देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातमी - Shirdi News: शिर्डीच्या साईमंदिर परिसरातील कुत्रे का होतायत लठ्ठ? मोठं कारण आलं समोर

या बँकेत शेकडोच्या संख्येने तालुक्यातील महिलांचे खाते आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत जाऊ नये यासाठी महिला रात्रीपासूनच बँकेसमोर लाईन लावत आहेत. रात्री डब्बे खाऊन महिला बँकेसमोरच झोपत आहेत. के वाय सी करण्यासाठी सकाळी आपला नंबर लागावा यासाठी या लाडक्या बहिणींना अश्याप्रकारे रात्रभर रस्त्यावर झोपण्याची वेळ येत आहे. आता लाडक्या बहिणींना सोसाव्या लागणाऱ्या या त्रासाकडे सरकार लक्ष कधी देणार? हे पाहावे लागणार आहे. 

Advertisement