लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा, वाचा कुणाला मिळाले 3 हजार रुपये

Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यामध्ये जमा झाला आहे

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यामध्ये जमा झाला आहे. 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वी ही रक्कम जमा करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारनं केली होती. पण प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये जमा झाले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

31 जुलैपूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केलेत अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. त्या लाभार्थ्यांना जून आणि जुलै महिन्याचे मिळून 3 हजार रुपये मिळाले आहेत. ज्या महिलांनी या नंतर अर्ज भरले आहेत, त्यांना 17 ऑगस्ट रोजी या योजनेतील पैसे जमा होतील, असं सरकारनं स्पष्ट केलंय.

यापूर्वी या योजनेतील एक रुपया ट्रायल म्हणून महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला होता. त्यानंतर आता आणखी एका टप्प्यात राज्यभरातील महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनाही पैसे लवकर जमा होतील. लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

( नक्की वाचा : 'भावानं मागितलं असतं तर सर्व काही देऊन टाकलं असतं,' काय पक्ष आणि चिन्ह, सुप्रिया सुळेंचं उत्तर )
 

काय आहे लाडकी बहीण योजना?

राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. 

Advertisement

आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह 1500 रुपये जमा होणार आहेत. 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.