फेरीवाल्यांची समस्या ही मुंबईमध्ये दिवसेंदिवस तापदायक बनत चालली आहे. फेरीवाल्यांनी मुंबईच्या अनेक भागांमध्ये खासकरून स्टेशन परिसराचे रस्ते जवळपास 50 टक्के अडवल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते. मुलुंड पश्चिमेकडे स्टेशन परिसरामध्येही हेच चित्र पाहायला मिळते. फुटपाथवर आपले बस्तान मांडलेल्या फेरीवाल्यांनी अख्खे फुटपाथ गिळंकृत केले आहेत. फुटपाथवर बस्तान मांडलेल्या या फेरीवाल्यांनी जागा कमी पडत असल्याने आता रस्तेही गिळायला सुरुवात केले आहे. याचं एक ताजं उदाहरण मुलुंड पश्चिमेला असलेल्या आर.आर.टी रोडवर पाहायला मिळालं. मुलुंडमधील एका व्यक्तीने या फेरीवाल्यांनी कशापद्धतीने अर्धा रस्ता काबीज केला आहे हे व्हिडीओतून दाखवण्याचा प्रयत्न केला.
नक्की वाचा:ChatGPT चा वापर करून स्कॅमरलाच रडकुंडीला आणलं; फोटो अन् लोकेशन पण केलं शेअर
फेरीवाल्यांना जाब विचारल्याने धमक्या
व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने या फेरीवाल्यांना तुम्ही रस्ता सोडून बसू शकत नाही का? असं म्हणत जाब विचारला. हा व्हिडीओ काढत असताना सफारी घातलेला माणूस आला आणि त्याने व्हिडीओ काढणाऱ्याशी हुज्जत घालायला सुरूवात केली. हे फेरीवाले आमचे आहेत, मी फेरीवाल्यांच्या संघटनेचा अध्यक्ष आहे. जर पुन्हा रस्त्यावर भाज्या मांडल्या तर कानाखाली आवाज काढेन असं मी भाजीवाल्यांना सांगितलंय. व्हिडीओ काढणाऱ्याने तू मला धक्का का मारला असा प्रश्न विचारला असता त्याने गोलगोल उत्तरं देण्यास सुरूवात केली.
नक्की वाचा: बापरे! ठाणेकरांची आणखी वाट लागणार!! घोडबंदरबद्दलची मोठी बातमी
परप्रांतीय फेरीवाल्याच्या दादागिरीचा व्हिडीओ पाहा
व्हिडीओ काढणाऱ्याचा फेरीवाल्याने केला पाठलाग
हा व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीचा एका फेरीवाल्याने पाठलाग केला. पाठलाग करणारा हा देखील एक फेरीवालाच असल्याचं दिसून आलं आहे. व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीच्या कारचा पाठलाग काढत हा फेरीवाला त्याच्या बिल्डींगपर्यंत पोहोचला होता. बिल्डींगच्या दारापाशी पोहोचल्यानंतर व्हिडीओ काढणाऱ्याने या पाठलाग करणाऱ्याला जाब विचारत त्याचाही व्हिडीओ काढला आहे. या घटनेवरून फेरीवाले किती मुजोर झाले आहेत आणि त्यांना जाब विचारणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी ते कोणत्या थराला जाऊ लागले आहेत, हे या घटनेवरून दिसून येत आहे.
पाहा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ
फेरीवाल्यांविरोधात तक्रार कशी करायची ?
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रार करण्यासाठी नागरीक 1916 या नंबरवर फोन करू शकतात. मिड-डे ने दिलेल्या बातमीनुसार सदर घटनेनंतर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने दखल घेतली असून हा रस्ता फेरीवाला मुक्त केला आहे.