जाहिरात

ट्रॅफिकमुळे बाळाचा जीव गेला! मुंबईकडे येणारी अँब्युलन्स 5 तास अडकली, आईच्या कुशीतच थांबला श्वास

ट्रॅफिकमुळे बाळाचा जीव गेला! मुंबईकडे येणारी अँब्युलन्स 5 तास अडकली, आईच्या कुशीतच थांबला श्वास

मनोज सातवी, प्रतिनिधी:

Mumbai Ahmedabad Highway Traffic Jam Causes Death Of Child: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे एका 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा बळी गेल्याची दुर्दैवी, संतापजनक तितकीच काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या दीड वर्षीच्या चिमुकल्याला उपचारासाठी तातडीने मुंबईकडे आणले जात होते. मात्र त्याची रुग्णवाहिका तब्बल पाच तास वाहतूक कोंडीमध्ये अडकली यातच या निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. (Baby Died Due To Heavy Traffic)

वाहतूक कोंडीने घेतला निष्पाप बाळाचा बळी! (Child Death Due To Heavy Traffic)

समोर आलेल्या माहितीनुसार, ठाणे घोडबंदर महामार्गावरील (Thane- Ghodbandar Road)  दुरुस्तीच्या कामासाठी, तसेच ठाणे शहरात वाहतूक कोंडी  होऊ नये म्हणून मुंबई अहमदाबाद महामार्गावर ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक सकाळी सहा ते रात्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे एका १६ महिन्याच्या निष्पाप मुलाचा बळी गेला. वाहतूक कोंडीत (Ambulance Struck In Traffic) रुग्णवाहिका थांबल्यामुळे त्याला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. यातच या चिमुकल्याने जीव सोडला. मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

 या या चिमुकल्यावर नायगावच्या चिंचोटी येथील गॅलेक्सी रुग्णालयात  उपचार सुरू होते. पुढील उपचारांसाठी त्याला तातडीने मुंबईच्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र, सकाळपासून सुरू असलेल्या महामार्गावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका तब्बल  पाच तास अडकून पडल्याने चिमुकल्याला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

Thane News: नवरात्रीत ठाण्यातील वाहतुकीतील मोठे बदल, बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग कोणते?

महिलेनेही गमावला होता जीव!

विशेष म्हणजे याच वाहतूक कोंडीत 30 जुलै रोजी सफाळे पश्चिमेकडील मधुकर नगर येथील छाया कौशिक पुरव यांचा दूदैवी मृत्यू झाला होता. ठाणे घोडबंदर महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स अडकल्यामुळे पालघर तालुक्यातील सफाळे, मधुकर नगर येथे राहणाऱ्या छाया  पुरव यांना जीव गमवावा लागला होता. छाया यांच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. 

त्यांना सुरुवातीला पालघर येथे उपचारासाठी नेण्यात आले मात्र प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात नेत असताना मुंबई अहमदाबाद मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकडे जायला खूप उशीर होत होता.  परिणामी छाया गुरव यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना मिरा रोड येथील आर्बिट हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com