Mumbai BEST Strike: शुक्रवारपासून सुरु असलेल्या बेस्टच्या संपाने मुंबईकरांचे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळाले. बेस्ट बसेस बंद असल्याने मुंबईकरांना ओला, उबेर आणि रिक्षाने प्रवास करावा लागला मात्र रिक्षाचालकांनी बंदचा फायदा घेत अव्वाच्यासवा भाडे लावल्याने मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागला. या बंदवर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक बोलावली होती मात्र या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने आजही बेस्टचा संप सुरुच राहणार आहे.
BT Deshmukh: विदर्भाच्या शिक्षक चळवळीचा महामेरू हरपला! प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांचे निधन
आजही बेस्टला ब्रेक, मुंबईकरांचे हाल
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा निष्फळ ठरली आहे, त्यामुळे आजही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार आहे. बेस्टची अत्यावश्यक सेवा संप काळातही सुरु राहण्यासाठी मेस्मा लागू करण्यात आला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांसोबत भेट होऊल मागण्यांविषयी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचं बेस्ट कृती समितीने म्हटले आहे. त्यामुळे आजही मुंबईकर नोकरदारांचे हाल होणार आहेत. संप काळात बेस्टच्या अधिकाऱ्यांनी कामगारांच्या संपामध्ये सहभागी होऊ नये असं आवाहन बेस्टने केले आहे.
बेस्टच्या संपामुळे बीकेसीमधल्या सार्वजनिक वाहतूक दिनाचा फज्जा उडाला. बीकेसीतल्या ऑफिसमध्ये पोहोचताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. बीकेसीत जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने अनेकांना पायीच कार्यालय गाठावं लागलं. कुर्ला आणि वांद्रेपासून अनेकजण पायीच ऑफिसमध्ये पोहोचले. शेअर रिक्षा आणि शेअर टॅक्सीवाल्यांचीही काल मनमानी दिसून आली. दररोजच्या भाड्यापेक्षा अधिकचं भाडं वसूल केल्याच्या अनेक तक्रारी प्रवाशांनी केल्या.
मेट्रो झाली मालमाल
दुसरीकडे, बेस्टच्या संपामुळे मेट्रो मात्र मालामाल झाली. शुक्रवारी सर्वच मेट्रो मार्गावरच्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ झाली. वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवर तब्बल संध्याकाळपर्यंत 38 हजार अतिरिक्त प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. त्यामुळे मेट्रोच्या अतिरिक्त 10 फेऱ्या चालवण्यात आल्या. भूयारी मेट्रो 3 वरही प्रवाशांची संख्या पहिल्यांदाच 2 लाखांच्या पार पोहोचली होती. आजही बेस्टचा संप कायम असल्याने मेट्रो स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world