Mumbai Crime: सावधान! मुंबईत मालिश गँगची दहशत, ज्येष्ठ नागरिक टार्गेटवर, शिवाजी पार्क परिसरात काय घडलं?

शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या धक्कादायक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, मुंबई: 

Mumbai Shivaji Park Crime News:  मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.  ज्येष्ठ नागरिकांची मालीश करण्याच्या बहाण्याने ही टोळी घरामध्ये घुसायची आणि घरफोडी करायची. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या धक्कादायक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

सावधान! मुंबईत फिरतेय मालिश गँग, ज्येष्ठ नागरिक टार्गेटवर

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शिवाजी पार्क परिसरात ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. मालीश करण्याच्या बहाण्याने घरात शिरून वृद्धांना डांबून ठेवत लूटमार करणाऱ्या या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

Shocking news: लाईक्सच्या हव्यासात सीमा ओलांडली! पोलिसांनी ‘रीलस्टार'ला लायकी दाखवली

 आरोपींची कार्यपद्धती अत्यंत नियोजित होती. हे भामटे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची रेकी करायचे. जेव्हा घरात ज्येष्ठ नागरिक एकटे असत, तेव्हा ही टोळी मालीश करण्याचा बहाणा करून घरात प्रवेश करायची. त्यानंतर त्यांना धमकावून, हातपाय बांधून घरातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास करायचे. शिवाजी पार्क नजिक राहणाऱ्या एका ६२ वर्षीय वृद्धाच्या बाबतीत असाच प्रकार घडला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी आवळल्या मुसक्या

​शिवाजी पार्क पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे या टोळीचा छडा लावला. यात विकास रणविर सिंग (१९), विवेककुमार शिवदंतबनारी कुमार ठाकूर (१९) आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. या टोळीने शहरातील इतर भागातही अशा प्रकारे गुन्हे केले असावेत, असा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलिस अधिक तपास करत असून, यामागे आणखी कोणी मोठे सूत्रधार आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना घरात घेताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Buldhana News: झोपेतून उठताच ॲसिडिटी, 21 वर्षीय तरुणी अस्वस्थ, पुढं जे घडलं.. गावावर शोककळा!