जाहिरात

Water Taxi Mumbai-Navi Mumbai : देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी गेटवे ते JNPA; तारीख ठरली! तिकीट, वेळ जाणून घ्या!

Gateway to JNPA e-water taxi : मुंबईतून नवी मुंबईला ई-वॉटर टॅक्सीने जाता येणार आहे. गेटवे ते जेएनपीए हा प्रवास अवघ्या काही मिनिटात करणं शक्य होणार आहे.

Water Taxi Mumbai-Navi Mumbai : देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी गेटवे ते JNPA; तारीख ठरली! तिकीट, वेळ जाणून घ्या!
ई-वॉटर टॅक्सीने कुठून कुठे जाऊ शकता, काय असेल तिकीटदर, जाणून घ्या.

Gateway to JNPA E-Water Taxi : अखेर मुंबईत देशातील (India's first water taxi) पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. या ई-वॉटर टॅक्सीमार्फत गेटवे ते जेएनपीए असा प्रवास करता येणार आहे. ई-वॉटर टॅक्सी ही अतिजलद असल्याने अवघ्या 40 मिनिटात तुम्ही जेएनपीएला पोहोचता येणं शक्य होणार आहे.

कधीपासून सुरू होणार ई-वॉटर टॅक्सी?

गेटवे ते जेएमपीए ही ई-वॉटर (विद्यूत) टॅक्सी 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईतून नवी मुंबईला ई-वॉटर टॅक्सीने जाता येणार आहे. गेटवे ते जेएनपीए हा प्रवास अवघ्या 40 मिनिटात करता येणार आहे. सध्या या भागात लाकडी बोटी आहेत. मात्र या प्रवासासाठी त्यांना एक तासाहून अधिक वेळ लागतो. मात्र ई-वॉटर टॅक्सी ही जलद असल्याने गेटवेहून अवघ्या 40 मिनिटात जेएनपीए गाठता येणार आहे.

Panvel-borivali-Vasai Rail Corridor : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा गेमचेंजर कॉरिडॉर; पनवेल, भिवंडीला मोठा फायदा

नक्की वाचा - Panvel-borivali-Vasai Rail Corridor : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा गेमचेंजर कॉरिडॉर; पनवेल, भिवंडीला मोठा फायदा

किती असेल तिकीट?

भारतात बांधणी झालेल्या दोन वॉटर टॅक्सी गेटवे ते जेएनपीए मार्गावर असतील. त्यापैकी एक सौर ऊर्जेवर चालणारी तर दुसरी विद्युत असेल. टॅक्सीची क्षमता 20 प्रवासी इतकी असेल. गेटवे ते जेएनपीए हा प्रवास अवघ्या 100 रुपयात करता येणार असण्याची शक्यता आहे.

सध्या मुंबईत वाहतूक यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्यामुळे ई-वॉटर टॅक्सीमुळे काही प्रमाणात तरी नागरिकांना दिलासा मिळू शकतो. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यासाठी आग्रही आहेत. लवकरच गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा, आणि गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गावरही काम केलं जाणार असून यामुळे मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com