जाहिरात

Panvel-borivali-Vasai corridor : मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा गेमचेंजर कॉरिडॉर; पनवेल, भिवंडीला मोठा फायदा

Panvel-borivali-Vasai Rail Corridor : 69.23 किमी मार्गाच्या या उपनगरीय लोकल सेवेमुळे नवी मुंबई परिसरातून मुंबईच्या पश्चिमेला सहज जाता येणं शक्य होणार आहे.

Panvel-borivali-Vasai corridor : मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा गेमचेंजर कॉरिडॉर; पनवेल, भिवंडीला मोठा फायदा
नव्या कॉरिडोरमुळे नवी मुंबईतून थेट बोरिवली आणि वसई गाठता येणार.

Panvel-borivali-Vasai Rail Corridor : मुंबई- मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा बहुप्रतिक्षित पनवेल-बोरिवली-वसई लोकल ट्रेन कॉरिडॉरला लवकरच सुरुवात होणार आहे. मंत्रिमंडळाच्या इन्फ्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. 
दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला पनवेल-बोरीवली-वसई लोकल ट्रेन कॉरिडोर मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (Mumbai Urban Transport Project) म्हणजेच एमयूटीपीच्या 3 बीच्याअंतर्गत आकारास येणार आहे. 

नवी मुंबईतून थेट बोरिवली आणि वसई गाठता येणार (Navi Mumbai to Borivali and Vasai)
69.23 किमी मार्गाच्या या उपनगरीय लोकलसेवेमुळे नवी मुंबई परिसरातून मुंबईच्या पश्चिमेला सहज जाता येणं शक्य होणार आहे. त्यासाठी पनवेलच्या प्रवाशांना कुर्ला किंवा वडाळा येथून ट्रेन बदलण्याची गरज उरणार नाही. यामुळे नवी मुंबईतून नोकरीसाठी मुंबई पश्चिमेला जाणाऱ्या अनेक प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्यांना पुणे किंवा गोव्यासाठी जाताना थेट पनवेल स्टेशनवर येता येणार आहे. सद्यस्थितीत पनवेल- दिवास-वसई अ्सा एक रेल्वे मार्गा कार्यान्वित आहे,. मात्र त्या मार्गाला कुठलाही स्पर्श न करता, हा नवा कॉरिडॉर तयार करण्यात येत आहे. 

भिवंडी, पलावा परिसरात राहणाऱ्यांना मोठा फायदा 
लूम पॉवर इंडस्टी अशी ओळख असलेल्या भिवंडी शहराला यामुळे नवी मुंबई आणि मुंबई पश्चिमेशी थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. त्यामुळे भिवंडीसारख्या शहराच्या विकासासाठी हा मार्ग उपयोगी ठरणार आहे. शिळफाटा रस्त्यावर असलेल्या पलावा, रुणवाल सिटी यासारख्या मोठ्या वसाहतींनाही या रेल्वे मार्गामुळे दिलासा मिळणार आहे. त्यांची कनेक्टिविटी थेट बोरिवली, वसईपर्यंत तर दुसरीकडे पनवेलपर्यंत होणार आहे. 

Beed News : रेल्वेच्या शिट्टीची प्रतीक्षा संपली! बीड रेल्वे स्टेशन दिमाखात उभे, काम अंतिम टप्प्यात

नक्की वाचा - Beed News : रेल्वेच्या शिट्टीची प्रतीक्षा संपली! बीड रेल्वे स्टेशन दिमाखात उभे, काम अंतिम टप्प्यात

कसा असेल हा प्रकल्प
   
1. 69.23 किमी मार्गाचा उपनगरीय लोकल सेवा कॉरिडॉर
2. या प्रकल्पासाठी तब्बल 12710.82 कोटींचा खर्च अपेक्षित 
3. नवी मुंबईतील पनवेल स्टेशनपासून वसई मार्गे बोरीवली आणि विरारला जोडणारी समर्पित रेल्वे लाईन 
4. या  मार्गावर एकूण 19 रेल्वे स्टेशन्स असतील 
5. वसई रोड, जुचंद्र, जुचंद्र स्टेशनपासून बोरिवलीची कनेक्टिव्हीटी असेल
6. जुचंद्र, कामन रोड, पाये गाव, खरबाव, डुंगे, कलवार, भिवंडी रोड, पिंपळस, नवी डोंबिवली, कोपर, निळजे, नांदवली, नारिवली, निघू, तळोजे पानचंद, पिंढार, नवाडे रोड, कळंबोली, तेंबोडे, नवीन पनवेल 
7. पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीला हा प्रकल्प मजबूत करेल. 

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरचा ताम कमी होणार 

हा कॉरिडॉर झाल्यानंतर सध्याच्या उपनगरीय मार्गांवर गर्दी कमी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. पश्चिम रेल्वे मार्गावर जाण्यासाठी सध्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना कुर्ल्यापर्यंतचा प्रवास करुन दादरवरुन लोकल गाठावी लागते. या नव्या कॉरिडॉरमुळे या प्रवाशांचा ताण हार्बर अप आणि मध्य रेल्वेवर पडणार नाही.   

नव्या वसई-पनवेल उपनगरीय कॉरिडॉरमुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांना पनवेलहून गोवा आणि पुण्याला जाण्यासाठी ट्रेन पकडणं सोपं होईल. त्यांना वसई किंवा बोरीवलीहून थेट पनवेलला येऊन गाडी पकडता येईल. 

आणखी कोणत्या प्रकल्पांना मंजुरी 

1. एमयूटीपी III-B उपक्रमात बदलापूर-कर्जत दरम्यान तिसरी लाइन -1325.02 कोटी, 32,46 किमी 
2. आसनगाव-कसारा दरम्यान चौथी लाइन 871.63 कोटी, 34.97 किमी 

या संपूर्ण उपक्रमाचं बजेट 14907 कोटी रुपये इतकं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com