Mumbai Goa Highway:  मुंबई-गोवा हायवेच्या दुरुस्तीसाठी स्टील स्लॅगचा वापर, 70 टक्के काम झाल्याचा दावा

मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. खड्डे आणि सुरू असलेले काम यामुळे या महामार्गावर यंदाही कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवासाठी 10 लाख प्रवासी कोकणात जाण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील दुरुस्तीचे काम जलदगतीने सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा येत होता. असे असले तरी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुमारे 70% काम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जोरदार पावसामुळे काम वेगाने पूर्ण करणे शक्य होत नव्हते. पावसाचा तडाखा बसला नसता तर आतापर्यंत दुरुस्तीचे  90% काम पूर्ण केले असते. 

मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. खड्डे आणि सुरू असलेले काम यामुळे या महामार्गावर यंदाही कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पडणाऱ्या खड्ड्यांसंदर्भा एनडीटीव्ही मराठीने सातत्याने बातम्या प्रसारीत केल्या आहेत. सोबतच प्रवाशांना होत असलेल्या त्रासाच्या बातम्याही सरकारपर्यंत पोहचवल्या आहेत. याचाच परिणाम म्हणून या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

नक्की वाचा - Thane Station Konkan Express : कोकणात जाण्यासाठी 25 तास वेटिंग; गणेशभक्तांचे हाल, स्थानकात तुडुंब गर्दी

रस्ते दुरुस्तीसाठी 'स्टील स्लॅग' या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याची माहिती मिळाली आहे. 'स्टीलनिमिर्मिती करत असताना निर्माण केले जाणारे हे बायप्रॉडक्ट असल्याचे पीडब्य्लूडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर यशस्वीरित्या करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.  या तंत्रज्ञानामुळे रस्ते अधिकचा भार सहन करण्यासाठी सक्षम होतात, ते अधिक टिकाऊ होतात आणि रस्त्यावरून वाहने घसरण्याचे प्रमाणही कमी होते असा दावा करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे खड्डे पडण्याची शक्यता कमी होते आणि त्यामुळे रस्त्याच्या देखभालीसाठीचा खर्चही कमी होतो असा दावा करण्यात आला आहे. 

Advertisement

मुंबई-गोवा महामार्ग 460 किमी लांबीचा आहे, ज्यापैकी 84 किमी लांबीचा भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अखत्यारीत येतो, तर उर्वरित भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. यापूर्वी, चिपळूण येथील वशिष्ठी पुलावरील खड्ड्यांचा ड्रोन व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रस्ते सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तो पूल तात्काळ दुरुस्त केल्याचे स्पष्ट केले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पनवेलच्या उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) उत्सवादरम्यान 16 टनांपेक्षा जास्त वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे.