Mumbai Illegal School News: राज्यातील अनधिकृत शाळांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात तब्बल १६४ शाळा कोणत्याही वैध मान्यतेशिवाय सुरू असल्याचे समोर आले आहे. या शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सध्या टांगणीला लागले असून, हा प्रश्न आता विधिमंडळात पोहोचला आहे. शिवसेनेच्या सदस्यांनी विधान परिषदेत या शाळांच्या वैधतेबाबत सरकारला धारेवर धरले आहे.
Mumbai News: सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले अन् वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी;व्यापाऱ्याचं टोकाचं पाऊल
मुंबईत १६४ शाळा अनधिकृत
शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार, या शाळा अनधिकृत ठरवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील ४८ शाळांनी मान्यतेसाठी पालिकेकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, बहुतांश शाळा या दाटीवाटीच्या झोपडपट्टी परिसरात असल्याने, विद्यार्थ्यांचे इतर सरकारी किंवा मान्यताप्राप्त शाळांत समायोजन कसे करायचे, हा मोठा तांत्रिक अडथळा असल्याचे सरकारने लेखी उत्तरात मान्य केले आहे.
डिसेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार, अनधिकृत शाळांसाठी स्थानिक शिक्षणाधिकारी वैयक्तिकरीत्या जबाबदार असतील आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. तरीही, या शाळा अद्याप सुरूच कशा, असा सवाल आमदार अनिल परब आणि सचिन अहीर यांनी उपस्थित केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावर उत्तर दिले असून, कारवाईची प्रक्रिया संथ असल्याने विद्यार्थ्यांचा प्रश्न जटिल झाला आहे.
(नक्की वाचा- VIDEO: भयंकर! धावत्या स्कूल व्हॅनमधून 4 मुले रस्त्यावर पडली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल)
कोणत्या भागात आहेत अनधिकृत शाळा?
एम/पूर्व मानखुर्द विभाग - ६५
पी/उत्तर मालाड विभाग - २५
आर/दक्षिण कांदिवली विभाग - १२
एल विभाग - १२
इंग्रजी माध्यम - १४५
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world