Mumbai Jalna Vande Bharat Express Extended To Nanded Launch : आजचा दिवस मराठवाड्यासाठी खास आहे. आजपासून मुंबई ते जालना वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत धावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात (CM Devendra Fadnavis launches Mumbai to Nanded Vande Bharat Express) आला. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना प्रवास अधिक सुखकर करता येणार आहे.
मराठवाडा विभागातील रेल्वे प्रवासात मोठा बदल घडवणारी वंदे भारत एक्सप्रेस आता हजूर साहिब नांदेडपर्यंत धावणार आहे. आतापर्यंत ही गाडी जालना ते मुंबई दरम्यान चालत होती. पण आता ती प्रथमच नांदेडहून सुरू होणार आहे. ही गाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली असून यात आधुनिक सुविधा आणि आकर्षक रचना आहे. या मार्गावरील ही सर्वात वेगवान गाडी असून इतर गाड्यांच्या तुलनेत कमी वेळेत प्रवास पूर्ण करते. गाडीमध्ये 20 डबे असून 1440 प्रवासी बसण्याची सोय आहे.
मराठवाड्याला काय फायदा होणार?l Benefit for Marathwada
- * मराठवाड्यातील नांदेडला राज्याची राजधानी मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस
- * नांदेड ते मुंबई असा 610 कि. मी. चा प्रवास फक्त 09 तास 30 मिनिटांत पूर्ण, इतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी
- * गाडीचे डबे 8 वरून वाढवून 20 करण्यात आले असून, प्रवासी आसन क्षमता 530 वरून 1440 पर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे अधिक प्रवाशांना सुविधा मिळणार
- * महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी दिवसभरातील एसी प्रवासाची सुविधा
- * हुजूर साहिब नांदेडहून बुधवार आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस गाडीची सुविधा
- * प्रवाशांना उत्कृष्ट आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो
- * वारंवार प्रवास करणारे प्रवासी, भाविक, कर्मचारी आणि व्यापारी यांच्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त
- * पर्यटनस्थळे आणि तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सोपा होईल.
मुंबई ते नांदेड वंदे भारतचे थांबे l Mumbai Nanded Vande Bharat Express Stops
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
दादर
ठाणे
कल्याण
नाशिक रोड
मनमाड
औरंगाबाद
जालना
परभणी
नांदेड