Mumbai Local Mega Block News: अक्षय तृतीयेच्या दिनी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या, १९ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा होणार आबे. मध्य रेल्वेने हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर, तर पश्चिम रेल्वेने सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान जम्बो ब्लॉकची घोषणा केली आहे. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षेच्या कारणास्तव हे ब्लॉक घेण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल/बेलापूर दरम्यान ब्लॉक असेल. सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन सेवा आणि सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ दरम्यान पनवेलहून सुटणाऱ्या अप सेवा रद्द राहतील. प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान काही विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला असला, तरी पनवेलच्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
त्याचबरोबर ट्रान्स हार्बर मार्गावरही सकाळी ११.०२ ते ३.५३ दरम्यान पनवेलहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक आणि सकाळी १०.०१ ते ३.२० दरम्यान ठाण्याहून पनवेलकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असेल. मात्र, प्रवाशांची सोय म्हणून सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे: जम्बो ब्लॉकचा परिणाम
पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ५ तासांचा जम्बो ब्लॉक असेल. या काळात सर्व जलद गाड्या धीम्या मार्गावरून चालवल्या जातील, ज्यामुळे गाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे. रेल्वे रुळांची निगा राखणे आणि ओव्हरहेड वायरची दुरुस्ती यासाठी हे काम अत्यावश्यक असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
Lok Sabha News: लोकसभेत महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक फेटाळले; इतर दोन विधेयकांचं काय झालं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world