Sushul Raheja Assult Marathi Youth: मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी- मराठीवरुन वाद पेटला आहे. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा याने मराठी तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुम घाटी लोग नही सुधरोगे म्हणत सुशील रहेजा यांनी मराठी तरुणाला मारहाण केली. याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील प्रसिद्ध व्यवसायिक सुशील रहेजाने मराठी तरुणाला मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण हा रहेजाच्या चेंबुर येथील कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होता. घटनेच्या दिवशी कार्यालयीन मिटींगवेळी क्षुल्लक कारणावरुन सुशील रहेजाने या तरुणाला मारहाण केली. घटनेच्या दिवशी कार्यालयीन मिटींग होती.
Holiday News: 7 फेब्रुवारीला राज्यात सुट्टी जाहीर, कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?
यावेळी कागदपत्रावर स्टॅपल व्यवस्थित न जोडल्याच्या रागातून सुशील रहेजाने तरुणाला शिवीगाळ केली. तुम घाटी लोग कभी नही सुधरोगे असं म्हणत त्याने तरुणाला मारहाण केली. तसेच त्याला पुन्हा कामावर येता येऊ नये अशी वागणूकही त्याला देण्यात आली. या घटनेनंतर तक्रारदार तरुणाने थेट गोवंजी पोलीस ठाणे गाठत सुशील रहेजाविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसात तक्रार दाखल
या तक्रारीच्या आधारे रहेजाविरोधात कलम ११५ बीएनएस २०२३सह अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम) १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे, मीरा- भाईंदरमध्ये अमराठी महापौर बसवल्याने मराठी एकीकरण समितीसह मराठीप्रेमी पक्ष, संंघटना आक्रमक झाल्या आहेत. अशातच आता परप्रांतीय बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण झाल्याने वाद चिघळण्याची शक्यता आहे. पोलीस याबाबत काय पाऊले उचलतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.