जाहिरात

Mira Bhayandar: 'नाकावर टिच्चून अमराठी महापौर', मीरा भाईंदरमध्ये वाद पेटला, मराठा एकीकरण समिती आक्रमक

मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर पाहिजे, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली होती, मात्र आता अमराठी महापौर बसवल्याने मराठीप्रेमी आक्रमक झाले आहेत

Mira Bhayandar: 'नाकावर टिच्चून अमराठी महापौर', मीरा भाईंदरमध्ये वाद पेटला, मराठा एकीकरण समिती आक्रमक

Mira Bhayandar Mayor Controversy:  मीरा भाईंदरमध्ये महापौर पदाच्या निवडीनंतर नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. आज मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर मराठी एकीकरण समितीसह मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर पाहिजे, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली होती, मात्र आता अमराठी महापौर बसवल्याने मराठीप्रेमी आक्रमक झाले आहेत. 

अमराठी महापौर.. मीरा भाईंदरमध्ये मराठीप्रेमी आक्रमक

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरांची आज निवड करण्यात आली. यामध्ये भाजपच्या डिंपल मेहता यांनी बाजी मारली. डिंपल मेहता यांनी 79 मते मिळवत महापौरपद मिळवले. या निवडीनंतर मराठीप्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अमराठी महापौर केल्याचा विरोध करत मराठी एकीकरण समिती सुभाषचंद्र बोस मैदान जवळ एकत्र होण्याचं सुरुवात झाली. 

Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड! लातूर दौरा रखडला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह, मराठी एकीकरण समितीने आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी नव्या महापौरांच्या विरोधात मोर्चाही काढण्यात येत आहे. मराठी माणूस पेटून उठणार का? असा सवाल उपस्थित करत याठिकाणी मराठीप्रेमी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मराठी महापौर, आमची गरज आमचा अधिकार असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. 

मराठी एकीकरण समितीचा जोरदार विरोध... 

मराठी राज्य आहे, मराठी शहरे टिकली पाहिजेत, मराठी अस्तित्व टिकले पाहिजे. मुंबई गुजरातमध्ये जाईल या कारणामुळे संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. अनेकांनी गोळ्या खाल्ल्या. १०७ मराठे हुतात्मा झाले आणि मराठी राज्य स्थापन झाले. आता पुन्हा मुद्दाम मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून अमराठी महापौर बसवला जात आहे, अशी टीका करत याला आमचा विरोध असल्याची भूमिका मराठी एकीकरण समिती अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मांडली. 

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! 2 कोटी नागरिकांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा?

Listen to the latest songs, only on JioSaavn.com