Mumbai Metro 3 :37 KM लांब, 27 स्टेशन, मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रोचा शेवटचा टप्पा सेवेत, कधीपासून सुरुवात?

मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबई मेट्रो-3 म्हणजेच कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मार्ग एक्वा लाइन आता दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पूर्णपणे सुरू होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Metro 3 Aqua Line : मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबई मेट्रो-३ म्हणजेच कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मार्ग अॅक्वा लाइन आता दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पूर्णपणे सुरू होणार आहे. या मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक ते कफ परेड अशा शेवटच्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबरला उद्घाटन होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  

37 किलोमीटरची ही मार्गिका मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर एकूण 27 स्टेशन आहेत. ज्यापैकी 26 स्टेशन अंडरग्राऊंड आहेत. आरे ते वरळीपर्यंतचा 22.5 किमीची मार्गिका आधीच सुरू आहे. तर आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक ते कफ परेड पर्यंत 11 किलोमीटरची मार्गिका 30 सप्टेंबरला सुरू होईल. अशा प्रकारे आरे JVLR ते कफ परेडपर्यंतचा मार्ग मेट्रोने एका तासात पूर्ण करता येईल. रस्ते मार्गाने यासाठी 2 तासांहून जास्त वेळ लागतो. 

मुंबई मेट्रो - 3 अ‍ॅक्वा मार्गिकेचा कुलाबा-वांद्रे-सीप्झ कॉरिडोर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 30 सप्टेंबरपर्यंत प्रवाशांसाठी सुरू केलं जाणार आहे. मेट्रो-3 चं काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आलं. पहिला टप्पा आरे ते बीकेसीचं उद्घाटन 7 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. तर दुसरा टप्पा बीकेसी ते वरळीपर्यंत होता जो 9 मे 2025 रोजी सुरू झालं. आता तिसरा टप्पा अवघ्या काही दिवसात सुरू होईल. 

Advertisement

नक्की वाचा - Beed Ahilyanagar Railway : बीडकरांसाठी ऐतिहासिक क्षण; अहिल्यानगरपर्यंत 45 रुपयात प्रवास, वेळ, थांबा सर्वकाही

मेट्रो मार्गिका 3 किती फायद्याची?

ही लाइन केवळ दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांना जोडेल तर घरगुती आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांपर्यंत पोहोचणं सोपं होईल. अनेक प्रमुख धार्मिक स्थळं, रुग्णालय, शैक्षणिक संस्था, पर्यटन संस्था याच्या जवळून ही मार्गिका जाते. कुलाबा, वरळी, दादर, बीकेसी, सांताक्रूझ आणि सीएसएमटीसारख्या प्रमुख ठिकाणांना जोडणाऱ्या या मार्गिकेमुळे शहरातून वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल. 


मुंबई मेट्रो-3 चा संपूर्ण रूट आणि थांबे

आरे JVLR
सीप्ज
अंधेरी MIDC
मरोळ नाका
CSMIA टी2
सहारा रोड
CSMIA टी1 
सांताक्रूझ 
वांद्रे कॉलनी 
बीकेसी (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स) 
धारावी 
शीतलादेवी मंदिर 
दादर मेट्रो 
सिद्धिविनायक मंदिर 
वरळी 
आचार्य अत्रे चौक 
विज्ञान संग्रहालय 
महालक्ष्मी 
मुंबई सेंट्रल 
ग्रॅँट रोड 
गिरगांव 
कालबादेवी 
सीएसएमटी 
हुतात्मा चौक
चर्चगेट 
विधान भवन 
कफ परेड

Advertisement