Road Accident : मुंबई-नागपूर हायवेवर भीषण अपघात; महंत प्रियरंजन दास यांचा जागीच मृत्यू

प्रियरंजन दास बंगळुरूवरुन पिंपरी बुद्रुक येथे परतत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

जळगाव जिल्ह्यातील मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एरंडोल तालुक्यातल्या पिंपरी बुद्रुक फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली असून या अपघातात पिंपरी बुद्रुक येथील कबीर मठाचे महंत प्रियरंजनदास जागीच ठार (Mahant Priyaranjandas of Kabir Math dies) झाले. याशिवाय दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला आहे. प्रियरंजन दास बंगळुरूवरुन पिंपरी बुद्रुक येथे परतत होते.

ते दुचाकीच्या मागे बसले होते. यावेळी मागून ट्रकने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. कबीर पंथाचे महंत प्रियरंजन दास यांच्या अपघाती मृत्यूमुळे मात्र कबीरपंथावर मोठी शोककळा पसरली आहे.

नक्की वाचा - Pune Crime : माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीला लावला 82 कोटींचा चुना, चोरलेल्या पैशांनी केलं मोठं सायबर फ्रॉड

कसा झाला अपघात? 

मिळालेल्या माहितीनुसार, महंत प्रियरंजनदास आचार्य जळगावहून चारचाकी वाहनाने येत होते. ते पिंपरीच्या फाट्यावर उतरले. येथे प्रवीण नारायण पाटील नावाचा तरुण दुचारी घेऊन त्यांना न्यायाला आहे. महंत दुचाकीच्या मागे बसले होते. ट्रकने मागून दुचाकीला धडक दिल्याने महंतांचा जागीच मृत्यू झाला. ते ३५ वर्षांचे होते. गेल्या चार वर्षांपासून पिंपरी बुद्रुक येथील कबीर मठात आचार्य म्हणून सेवा देत होते. 

Advertisement

बंगळुरू येथील कबीर पंथाचा १५ दिवसांचा धार्मिक कार्यक्रम आटोपून ते पिंपरी बुद्रुकला परत येण्यासाठी निघाले होते. महंताच्या मृत्यूनंतर मोठ्या संख्येने लोक मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर उतरले होते. यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली होती. 


 

Topics mentioned in this article