Panvel News: गायरान जमिनीच्या वादातून अधिकाऱ्यांची गाडी अडवली, पनवेल- चिखलेमधील 16 जणांविरोधात कारवाई

निषेधार्थ गावच्या सरपंच दीपाली तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय तांडेल यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

नवी मुंबई: नवी मुंबई पनवेल चिखले गावातील गायरान जमिनीच्या वादातून निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत गटविकास अधिकाऱ्यांचे वाहन अडवल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी 16 ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (19 जुलै) दुपारी ही घटना घडली, तर रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

गायरान जमीन वादातून तणाव

पनवेल तालुक्यातील चिखले गावामध्ये काही काळापासून गायरान जमिनीच्या वापर आणि प्लॉटिंग संदर्भात वाद सुरू आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीने या जमिनीबाबत योग्य कारवाई केली नसल्याने अनेक वेळा नाराजी व्यक्त केली होती. याच निषेधार्थ गावच्या सरपंच दीपाली तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय तांडेल यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता.

Bhiwandi News: भिवंडी महानगरपालिकेच्या 'या' प्रभागात पाण्याचे संकट, घाणेरड्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

29 जुलै रोजी दाम्पत्याने स्वत:ला घरात बंद करून कमी तीव्रतेचे फिनाइल प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घराचे दार तोडून त्यांना बाहेर काढले आणि तातडीने नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनानुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. संपूर्ण प्रकारानंतर दुपारी सव्वातीन वाजता, गटविकास अधिकारी समीर वठारकर आणि ग्रामसेवक गणेश पाटील रुग्णालयातून परतत असताना गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर ग्रामस्थांनी त्यांच्या वाहनाला अडवले.

गावकऱ्यांनी वाहनासमोर बसून जवळपास तासभर अडवणूक केली आणि सरपंच तांडेल दाम्पत्याच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. तणावाची परिस्थिती वाढल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अखेरीस पोलिसांनी समजूत काढून वाहनाला मार्ग दिला. या घटनेनंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पनवेल तालुका पोलिसांनी १६ ग्रामस्थांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या खालील कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. सध्या तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

Advertisement

सरपंचावरील स्वतंत्र गुन्हा नोंद

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सरपंच दीपाली तांडेल आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी न घेता गायरान जमिनीवर प्लॉटिंग सुरू केल्याचे उघड झाले आहे. याबाबतही फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे सरपंचपद धोक्यात आले असून, सुनावणी सरपंच रुग्णालयात असल्याने पुढे ढकलण्यात आली आहे.

Thane Political News : ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद पेटला; एका बॅनरवरून दोन्ही गट आमने-सामने

प्रशासनाची बैठक

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पनवेलचे प्रांताधिकारी पवन चांडक यांनी बुधवारी दुपारी १२.३० वाजता आपत्कालीन बैठक घेतली. यामध्ये पोलिस, ग्रामपंचायत प्रतिनिधी, तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता. बैठकीत पुढील कार्यवाही आणि सुरक्षा उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली. या संपूर्ण घटनेमुळे चिखले गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी ग्रामस्थांना आवाहन केले असून, कायद्याच्या चौकटीत राहून समस्या सोडवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement