जाहिरात

Thane Political News : ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद पेटला; एका बॅनरवरून दोन्ही गट आमने-सामने

शिवसेनेने लावलेल्या या बॅनरवर राजन विचारे यांच्या चेहऱ्यावर फुली मारल्याचे चित्र होते, जे त्यांच्या निषेधाचे प्रतीक होते. मात्र, आता ठाकरे गटाच्याच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडल्याने दोन्ही गटांतील तणाव वाढला आहे.

Thane Political News : ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद पेटला; एका बॅनरवरून दोन्ही गट आमने-सामने

रिझवान शेख, ठाणे

Thane News : ठाणे शहरात शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील राजकीय वाद आता अधिकच तीव्र झाला आहे. माजी खासदार राजन विचारे यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून हा वाद शिगेला पोहोचला आहे, ज्याचा परिणाम म्हणून शहरात लावलेले शिवसेनेचे बॅनर फाडण्यात आले आहेत.

राजन विचारेंचे वादग्रस्त वक्तव्य

या वादाचे मूळ माजी खासदार राजन विचारे यांनी केलेल्या एका वक्तव्यात आहे. त्यांनी "ॲापरेशन महादेव अंतर्गत अतिरेक्यांना मारले म्हणजे काय मेहरबानी केली नाही" असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेने तीव्र शब्दांत निषेध केला होता. याच निषेधार्थ शिवसेनेने ठाण्यातील मेंटल हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन केले होते आणि राजन विचारे यांच्या निषेधाचे बॅनर लावले होते.

(नक्की वाचा- BMC Recruitment: मुंबई महापालिकेमध्ये बंपर भरती! अनुपस्थित विद्यार्थ्यांना 'या' तारखेला शेवटची संधी)

बॅनर फाडल्याने वाद वाढला

शिवसेनेने लावलेल्या या बॅनरवर राजन विचारे यांच्या चेहऱ्यावर फुली मारल्याचे चित्र होते, जे त्यांच्या निषेधाचे प्रतीक होते. मात्र, आता ठाकरे गटाच्याच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडल्याने दोन्ही गटांतील तणाव वाढला आहे. या घटनेमुळे ठाण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

(नक्की वाचा- Devendra Fadnavis: उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार)

राजन विचारेंच्या वक्तव्यावरून सुरू झालेला हा वाद बॅनर फाडण्याच्या घटनेने आणखी चिघळला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या कृत्यानंतर शिवसेना कार्यकर्ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या घटनेचे पडसाद ठाण्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com