Mumbai Alert: मुंबईकरांनो सावधान! जुलै महिना धोक्याचा... 'या' तारखा लक्षात ठेवा; BMCकडून मोठा अलर्ट

समुद्रात उंचच उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे या दिवसात नागरिकांना सावधतेचे सतर्क राहण्याचे आवाहन मुंबऊ महानगरपालिकेने केले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai High Tide Hit BMC Alert News:  जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने मुंबई शहराला अक्षरश: झोडपून काढले. आठवडाभर झालेल्या दमदार पावसात मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. आठवडाभर दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने अचानक ब्रेक घेतला आहे. अशातच बृहन्ममुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना सर्वात मोठा अन् महत्त्वाचा इशारा देत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Rain News: मान्सून गायब! पावसाचे दमदार कमबॅक कधी होणार? हवामान विभागाच्या इशाऱ्याने चिंता वाढली

पुढील चार दिवस धोक्याचे, समुद्र खवळणार! 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पावसाने ब्रेक घेतला असला तरी आजपासून पुढील चार दिवस मुंबईकरांसाठी धोक्याचे असणार आहेत. १४ जुलैपासून 18 जुलैपर्यंत असे सलग चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. जुलै महिन्यातील सर्वात मोठी भरती गुरुवारी येणार असून 4.89 मिटर इटली उंच ही लाट असणार आहे..दुपारी 1.36 वाजता ही लाट असणार आहे. त्यामुळे या दिवसात नागरिकांना सावधतेचे सतर्क राहण्याचे आवाहन मुंबऊ महानगरपालिकेने केले आहे. 

Advertisement

जुलै महिन्यात १४ जुलै ते १८ जुलै २०२६ या कालावधीत समुद्राला मोठी भरती येणार आहे. उधाणलेला समुद्र धोक्याची घंटा असू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. समुद्रकिनारी फिरायला जाणाऱ्या हौशी पर्यटकांसाठी हे महत्त्वाचे आवाहन असून भरती येण्याच्या काळात शक्यतो समुद्रकिनारी जाणे टाळावे, असं आवाहन महानगरपालिकेने केले आहे. 

पाऊस पुन्हा कधी कोसळणार?

दरम्यान, दमदार बॅटिंगनंतर अचानक गायब झालेल्या मान्सूनबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यात आता थेट  20 जुलैनंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा आठवडासुद्धा कोरडाच जाणार आहे. आजपासून पुढचा रविवार आणि सोमवारपर्यंत राज्यात कुठेही पावसाची शक्यता नसल्याची माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली आहे. 

Pune News: '24 जुलैला भेटशील ना?' पुण्यातल्या 'त्या' रहस्यमयी होर्डिंगचीच सर्वत्र चर्चा; नेमकं प्रकरण काय?