Mumbai News: मुंबईतील गोड आठवण इतिहासजमा! 112 वर्ष जुने 'हे' इराणी रेस्टॉरंट कायमचे बंद

कौटुंबिक वादामुळे हा  कॅफे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे जुन्या मुंबईचा एक सांस्कृतिक वारसा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Irani Eatery B Merwan Shuts Down: महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. ब्रिटीश काळातील बेट ते आता देशाची आर्थिक राजधानी.. असा प्रवास करणाऱ्या मुंबई शहरात अनेक जुन्या वास्तू आहेत. यापैकीच एक ठिकाण म्हणजे ग्रँट रोड स्टेशन बाहेरील बी मेरवान अँड कंपनी नावाचा इराणी कॅफे. तब्बल 112 वर्षांचा जुना इतिहास असलेल्या या कॅफेमधील पदार्थांची चव असंख्य मुंबईकरांच्या जिभेवर रेंगाळत असते. मात्र आता या कॅफेला कायमचे टाळे लागल्याचे समोर आले आहे. 

मुंबईतील 112 वर्ष जुना कॅफे कायमचा बंद

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  मुंबईच्या धावपळीच्या जीवनात ग्रँट रोड स्थानकाबाहेर पडल्यावर पडणारी पहिली नजर आणि नाकात भरणारा मावा केकचा तो दरवळ आता कायमचा इतिहासजमा झाला आहे. ग्रँट रोड (पूर्व) येथील ११२ वर्षे जुन्या आणि अत्यंत लोकप्रिय अशा 'बी. मेरवान अँड कंपनी' या इराणी हॉटेलला अखेर टाळे लागले आहे. कौटुंबिक वादामुळे हा कॅफे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे जुन्या मुंबईचा एक सांस्कृतिक वारसा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Crime News: नालासोपाऱ्यात 'व्हेल माशाची उलटी' जप्त; किंमत ऐकून थक्क व्हाल! दोघांना अटक

​२०१४ मध्येही हे उपहारगृह काही काळ बंद राहिले होते. पण काही तातडीच्या दुरुस्तीनंतर ते लवकरच पुन्हा सुरू झाले. पण यावेळी मात्र ते कायमचे बंद होत असल्याचे दिसत आहे. या हॉटेलच्या दरवाजावर  'आम्ही बंद करत आहोत, तुमच्या सहकार्याबद्दल आभार' अशी पाटी लावण्यात आली आहे. ही पाटी वाचून या ईराणी कॅफेच्या अनेक ग्राहकांना चांगलाच धक्का बसला आहे. 

मावा केक, मसाला ऑम्लेटसाधी होते प्रसिद्ध

या कॅफेमधील मावा केक सर्वत्र प्रसिद्ध होता. इथला 'मसाला ऑम्लेट', 'बन मस्का' आणि 'पाणी कम चाय'नेही मुंबईकरांना वेड लावले होते.  पिढ्यानपिढ्या मुंबईकरांनी प्रेम केले. ​गेल्या काही काळापासून येथे 'सेल्फ सर्विस' सुरू करण्यात आली होती, जी इथल्या जुन्या ग्राहकांना फारशी रुचली नव्हती. मात्र आता हा कॅफे कायमचा बंद होणार आहे. फोर्टमधील 'यझदानी' नंतर आता 'मेरवान'ही बंद झाल्याने, अस्सल इराणी संस्कृती जपणाऱ्या ठिकाणांची संख्या आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच उरली आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Mumbai News: मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)