जाहिरात

Ashok Hande Attack: तुला सोडणार नाही... मराठी बाणाचे निर्माते अशोक हांडेंवर मुंबईत हल्ला; नेमकं काय घडलं?

Ashok Hande Attack: 'मराठी बाणा'चे निर्माते अशोक हांडे यांच्यावर मुंबईतील माहीम कार्यालयात घुसून बॅटने हल्ला, पोलिसांनी आरोपीला अटक केली. वाचा सविस्तर बातमी.

Ashok Hande Attack: तुला सोडणार नाही... मराठी बाणाचे निर्माते अशोक हांडेंवर मुंबईत हल्ला;  नेमकं काय घडलं?
"Ashok Hande Attack: मराठी बाणा या लोकप्रिय कार्यक्रमाचे निर्माते अशोक हांडे यांच्यावर हल्ला"
Ashok Hande Facebook

- ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Ashok Hande Attack News: ज्येष्ठ लोककला अभ्यासक आणि 'मराठी बाणा' या लोकप्रिय कार्यक्रमाचे निर्माते अशोक हांडे यांच्यावर मुंबईतील माहीम परिसरात हल्ला करण्यात आला आहे. पार्किंगच्या किरकोळ वादातून एका व्यक्तीने हांडे यांच्या कार्यालयात घुसून त्यांना बॅटने बेदम मारहाण केली. या प्रकरणी माहीम पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

(नक्की वाचा: Nandurbar News: नंदुरबार हादरले! ती अचानक झाली गायब, 21 दिवसांनंतर शेताच्या बांधावर सापडला मृतदेह)

नेमका वाद काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक हांडे यांचे माहीम येथे कार्यालय आहे. आरोपी प्रथमेश पांडुरंग उनफोडे उर्फ बंटी हा त्यांच्या कार्यालयात घुसला. आरोपीने हांडे यांच्याकडे गाडी पार्क करण्यासाठी हफ्ता मागितला होता. हांडे यांनी हफ्ता देण्यास नकार दिल्याने आरोपी संतप्त झाला. "हफ्ता दिला नाही तर तुला सोडणार नाही," अशी धमकी देत त्याने बॅटने हांडे यांच्यावर हल्ला चढवला.

(नक्की वाचा: Nagpur News: रंगाचा थेंब पडला अन् आजीने 4 वर्षाच्या नातवावर उकळतं पाणी ओतलं, CCTV पाहून होईल संताप; पाहा VIDEO)

पोलिसांची कारवाई आणि आरोपीचा उद्धटपणा

घटनेची माहिती मिळताच माहीम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी प्रथमेश उनफोडे याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. आरोपीवर मारहाण, धमकी देणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या माहीम पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com