Uddhav Thackeray and Rajool Patil : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षफुटीनंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. शिवसेना ठाकरे गटातील तब्बल ६ आमदार फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. ऑपरेशन टायगर अंतर्गत हे ६ खासदार शिवसेनेच्या शिंदे सेनेत जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान संजय दिना पाटील यांच्या कन्येने थेट उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
वडिलांनी बंडखोरी केली, पण लेक निष्ठावान...
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोरी केल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरेंना दगा देणारे खासदास संजय दिना पाटील यांच्या लेकीने मात्र वेगळीच भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. संजय दिना पाटील यांची कन्या नगरसेवक राजुल पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. वडिलांनी त्यांचा निर्णय घेतलाय, मी मात्र ठाकरेंसोबत असं त्यांनी ठणकावून सांगितलं. ऑपरेशन टायगरच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक राजुल पाटील यांनी आज मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी पक्षात आहे, मी ठाकरे गटासोबतच राहणार. मी ठाकरे गटासोबत निष्ठेनं काम करणार असं राजुल पाटील म्हणाल्यात.
मी ठाकरेंसोबतच, निष्ठेनं काम करेन; वडिलांनी स्वतंत्र निर्णय घेतलाय- Sanajy Dina Patil यांची कन्या
— NDTV Marathi (@NDTVMarathi) June 21, 2026
ऑपरेशन टायगरच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक राजुल पाटील यांनी आज मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली.यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी पक्षात आहे, मी ठाकरे… pic.twitter.com/vej9W79pRf
कोण आहेत राजूल पाटील?
राजूल पाटील या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. त्या संजय दिना पाटील यांची कन्या आहेत. राजूल पाटील या मुंबई महानगरपालिकेतील भांडुप वॉर्ड क्रमांक ११४ च्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. याशिवाय त्या युवासेनाच्या कार्यकारिणी सदस्याही आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world