महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनस्थळांकडे निघाल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यातच आडोशी बोगद्यालगत गॅस टँकर आणि ट्रेलरचा अपघात झाल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खंडाळा घाट ते खालापूर दरम्यान तब्बल आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत असून काही मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी तासन् तास वेळ लागत आहे. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सुट्टीमुळे शासकीय व निमशासकीय कार्यालये बंद आहेत. तसेच शाळांना उन्हाळी सुट्या सुरू झाल्याने नागरिकांनी पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन केले आहे.
नक्की वाचा - Pune Crime : नामांकित मेडिकल महाविद्यालयात 4 कनिष्ठ डॉक्टरांचं रॅगिंग, 3 जणांचं निलंबन
त्यामुळे महामार्गावर अचानक वाहनांची गर्दी वाढली असून रस्त्यात अडकलेल्या पर्यटकांचं वेळेचं नियोजन कोलमडले असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.