
पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरणात तीन वरिष्ठ निवासी डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलं आहे. या तिघांनी चार कनिष्ठ डॉक्टरांना शारीरिक त्रास दिल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील एका नामांकित संस्थेत ही घटना घडल्याने राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या चार कनिष्ठ डॉक्टरांची रॅगिंग करण्यात आली होती, त्यांनी महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर याची दखल घेण्यात आली आहे. अधिष्ठातांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ डॉक्टरांच्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी तपासणी समिती नेमण्यात आली आहे. पुढील सात दिवसात या समितीची चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
नक्की वाचा - Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाचं! अक्षय्य तृतीयनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग
प्राथमिक तपासानुसार, वरिष्ठ निवासी डॉक्टरांकडून चार कनिष्ठ डॉक्टरांना दोन आठवडे शारिरीक त्रास देण्यात आला. याचा कनिष्ठ विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झाला. पुण्यासारख्या शहरामध्ये रॅगिंगसारखं गंभीर प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत या तिघांचं निलंबन कायम राहणार असल्याची माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world