Mumbai-Pune Expressway Missing Link Potholes: उद्घाटन होऊन दोन महिने उलटत नाहीत तोच खड्ड्यांचे साम्राज्य मुंबई-पुणे मार्गावरील महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाचा दावा करत १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच या मार्गावरील देशातील सर्वात उंच केबल स्टेड पुलावर खड्डे पडल्याचे समोर आले आहे.
दोनच महिन्यात मिसिंग लिंकवर खड्डे
यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कनेक्टिंक लिंगची उभारणी केली आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र उद्घाटनाच्या अवघ्या दोनच महिन्यात या मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याचं समोर आले आहे. याचा एक व्हिडिओही सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
प्रकल्पाचे तांत्रिक वैशिष्ट्य म्हणजे यातील दोन जुळ्या बोगद्यांना मिळालेली 'जगातील सर्वात रुंद बोगदे' अशी गिनीज बुकातील नोंद. दऱ्याखोऱ्यांमधून जाणारा हा मार्ग नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यास सक्षम असल्याचा दावा एमएसआरडीसीने केला होता. परंतु, पहिल्याच पावसाळ्यात या दाव्यांची हवा निघाल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चित्रफितीमध्ये पुलाच्या सुरुवातीलाच पडलेले खड्डे स्पष्टपणे दिसत आहेत, ज्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Ashadhi Wari: पालखी मार्गावर या वेळी असणार खास सोय, पुणे ग्रामीण पोलीसांनी सांगितली A TO Z तयारी