जाहिरात

Dive Ghat News: दिवे घाटातून प्रवास करताय? आधी 'हे' वाचा; पालखीसोहळ्यानिमित्त प्रशासनाचा मोठा निर्णय!

हडपसर-दिवेघाट पालखी मार्गावर आज दुपारी १२ ते २ या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

Dive Ghat News: दिवे घाटातून प्रवास करताय? आधी 'हे' वाचा; पालखीसोहळ्यानिमित्त प्रशासनाचा मोठा निर्णय!

यशपाल सोनकांबळे, पुणे:

Ashadhi Wari Sohala Dive Ghat Closed: आषाढी वारी दिंडी सोहळा आता अवघ्या चार दिवसांवर आला आहे. ७ जुलै तसेच ८ जुलै रोजी मानाच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. या पालखी सोहळ्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हडपसर-दिवेघाट पालखी मार्गावर आज दुपारी १२ ते २ या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

Rain News: तुफान पाऊस बरसणार! मुंबईसह 4 जिल्ह्यात रेड अलर्ट, कुठे कुठे शाळांना सुट्टी? हेल्पलाईन क्रमांक जारी

आज दिवे घाटातील वाहतूक बंद 

​दरवर्षी लाखो वारकरी या मार्गावरून प्रवास करतात. वारकऱ्यांची सुरक्षितता आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून घाटातील धोकादायक कडे आणि सुटे दगड हटविण्याचे काम सुरु आहे. यासाठी तातडीने ब्लास्टिंगचे काम हाती घेण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आळंदी-पंढरपूर पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने या मार्गावरील सुरक्षितता तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात दिवे घाटात दरड कोसळण्याचा धोका असतो, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे ब्लास्टिंग केले जात आहे. ​वाहतूक पोलिसांनी सर्व वाहनचालकांना या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. ब्लास्टिंगचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर आणि रस्ता सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतरच वाहतूक पूर्ववत केली जाईल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती वाहतूक विभागातर्फे करण्यात आली आहे.

Ashadhi Wari: पालखी मार्गावर या वेळी असणार खास सोय, पुणे ग्रामीण पोलीसांनी सांगितली A TO Z तयारी

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com