Mumbai- Pune Missing Link: मिसिंग लिंकचं नाव बदलणार? तात्पुरतं नाव देखील ठरलं, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे आता प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. या लोकार्पणावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंकच्या नावावरुन महत्त्वाचे विधान केले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल' बनवणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिसिंग लिंक आजपासून सुरु झाला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.  मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे आता प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. या लोकार्पणावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंकच्या नावावरुन महत्त्वाचे विधान केले. 

Rahit Pawar: "...तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य" रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

मिसिंग लिंक नाव बदलणार? काय म्हणाले मुख्यमंत्री? 

मुंबई- पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना  मिसिंग लिंकचं नाव बदलणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक म्हणा. याला नवीन नाव काय द्यायचं याचाही आम्ही विचार करू आणि लवकरच ठरवू. याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे. ज्यावेळी आपण ही तयार केली त्यावेळी ही लिंक नव्हती म्हणून आपण त्याला मिसिंग लिंक म्हणत होतो, असं ते म्हणाले.

Advertisement

तसेच  समोरचं नाव बदलून मिसिंग नाही तर कनेक्टिंग लिंक लिहिलं पाहिजे, अशा सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. लवकरच आम्ही त्याला नाव काय द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आता काहीही मिसिंग नाही.  मिसिंग लिंकमुळे अंतर ६ किमी आणि अंतर ३० मिनिटांनी कमी होणार आहे. इंधनाचीही बचत होणार आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

प्रवास होणार सुसाट

दरम्यान, हा नवीन मार्ग मुंबईच्या खोपोलीला लोणावळ्याजवळील कुसगावला जोडतो. याच्या उद्घाटनामुळे जुन्या घाट विभागातील अंदाजे ७०% वाहतूक वळवली जाईल अशी अपेक्षा आहे.या नवीन लिंगमुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचे अंतर अंदाजे ६ किलोमीटरने कमी होईल. या थेट आणि सोयीस्कर मार्गामुळे प्रवाशांच्या सरासरी ३० मिनिटांच्या वेळेची बचत होईल आणि इंधनाचा वापरही कमी होईल.

(नक्की वाचा-  Pune News: पुण्यात 'बंट्या' गोळ्यांचा मोठा साठा जप्त, 'फुलचंद पान' कनेक्शनमुळे खळबळ)