जाहिरात

Rahit Pawar: "...तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य" रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याबाबत रोहित पवार यांनी महत्त्वपूर्ण अट घातली आहे. जर अजित पवार यांचा पक्ष भाजपाची साथ सोडणार असेल, तरच एकत्र येणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Rahit Pawar: "...तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य" रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

प्रसाद शिंदे, अहिल्यानगर

Rahit Pawar on NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मोठे वक्तव्य करत अजित पवार गटासमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाची साथ सोडल्यासच पुन्हा एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी रोहित पवारांची 'अट'

रोहित पवार यांनी अजित पवार गटाच्या सध्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अजित पवार स्वतः सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर भाजपाविरोधात बोलत होते. सध्याच्या परिस्थितीत जर अजित पवारांचा पक्ष भाजपाच्या 'मांडीला मांडी' लावून बसणार असेल, तर पुन्हा एकत्र येणे कठीण असल्याचे रोहित पवार म्हणाले.

(नक्की वाचा-  LPG Price Hike: महागाईचा भडका! LPG सिलिंडर दरात मोठी वाढ, चेक करा नवे दर)

बारामतीत 'पवार विरुद्ध पवार'?

बारामतीमधील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत रोहित पवार यांनी 'पवार विरुद्ध पवार' या लढतीचे संकेत दिले आहेत. जर महायुतीत अजित पवारांचा पक्ष कायम राहिला आणि त्यांना उमेदवारी मिळाली, तर शरद पवार गटाकडूनही पवार घराण्यातीलच उमेदवार दिला जाईल. बारामतीत पवार कुटुंबातील व्यक्तींना समोरासमोर उभे करायचे नसेल, तर अजित पवारांनी भाजपाची साथ सोडावी, असे आवाहन त्यांनी केले.

(नक्की वाचा-  Pune News: पुण्यात 'बंट्या' गोळ्यांचा मोठा साठा जप्त, 'फुलचंद पान' कनेक्शनमुळे खळबळ)

लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये नणंद-भावजय म्हणजेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली होती. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा घरातीलच दोन सदस्य एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे बारामतीमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com