जाहिरात

Mumbai Rain: मुंबईकरांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका, हवामान विभागाकडून अलर्ट जारी; पुढील 3 तास महत्त्वाचे

काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. अधूनमधुन ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही दाट शक्यता आहे.

Mumbai Rain: मुंबईकरांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका, हवामान विभागाकडून अलर्ट जारी; पुढील 3 तास महत्त्वाचे

Mumbai Rain Red Alert:  मुंबई शहरासह उपनगरामध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरु आहे. या जोरदार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. जोरदार पावसाचा लोकल सेवेवरही परिणाम झाला असून अनेक मार्गांवरील वाहतूक खोळंबली आहे. अशातच आता हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 

मुंबईकरांनो सावधान! पुढील 3 तास महत्त्वाचे 

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिवसभरात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगर परिसरात संततधार पाऊस सुरू राहील. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. अधूनमधुन ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही दाट शक्यता आहे.

Dive Ghat News: दिवे घाटातून प्रवास करताय? आधी 'हे' वाचा; पालखीसोहळ्यानिमित्त प्रशासनाचा मोठा निर्णय!

कोणत्या भागात सर्वाधिक पाऊस ?

मुंबईत गेल्या २४ तासांत पावसाचा जोर कायम असून, विविध भागांत पावसाची नोंद झाली आहे. 'एच वेस्ट' वॉर्ड कार्यालया परिसरात सर्वाधिक १४६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असल्याने महानगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिक आणि प्रशासनाने पावसाच्या या नोंदींची दखल घेऊन काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

​१. पश्चिम उपनगरे (WS):

  • ​एच वेस्ट वॉर्ड ऑफिस: १४६.४
  • ​सुपारी टँक मनपा शाळा, वांद्रे: १४३.४
  • ​पाली चिंबई मनपा शाळा, वांद्रे: १४०.६
  • ​नारियल वाडी शाळा, सांताक्रूझ: ११५.२
  • ​एसडब्ल्यूएम सांताक्रूझ वर्कशॉप: ११३.६

    ​२. शहर विभाग (City):
  • ​जी साऊथ वॉर्ड ऑफिस: १४०.२
  • ​एफ नॉर्थ वॉर्ड ऑफिस: १३२.०
  • ​बी वॉर्ड ऑफिस: ११८.८
  • ​शिवडी कोळीवाडा मनपा शाळा: ११६.२
  • ​मलबार हिल: ११६.०
     

​३. पूर्व उपनगरे (ES):

  • ​मानखुर्द अग्निशमन केंद्र: १२६.८
  • ​कलेक्टर कॉलनी मनपा शाळा, चेंबूर: १२४.२
  • ​एमपीएस महाराष्ट्र नगर शाळा, मानखुर्द: १२०.८
  • ​रमाबाई मनपा शाळा, घाटकोपर: १२०.२
  • ​नूतन विद्या मंदिर: ११२.२

FIFA WC 2026: पुण्यापेक्षा लहान देशाचा भीम पराक्रम! बलाढ्य अर्जेंटिनाला जेरीस आणलं; तब्बल 120 मिनिटे झुंजवलं 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com