जाहिरात

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवेला नदीचं रुप, लोकलची स्थिती काय? वाचा सर्व अपडेट्स

Mumbai Rain Live Updates: या पावसामुळे अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाली तसेच रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. ज्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळाले.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवेला नदीचं रुप, लोकलची स्थिती काय? वाचा सर्व अपडेट्स

Mumbai Rain News: मुंबईमध्ये सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई- ठाण्यासह, अंधेरी, शिवाजी पार्क परिसर, वाशी, सानपाडा भागात पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाली तसेच रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. ज्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईत आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण भागात जोरदार पाऊस सुरु असून अंधेरी सब वे पाण्याखाली गेला आहे. अंधेरी पश्चिम आणि पुर्वेला जोडणारा सबवे पुल हा वाहतुकीसाठी मुख्य रस्ता मानला जातो. येथून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. मात्र अनेक वर्षापासून जास्त पाऊस झाल्याने हा पूल पूर्णपणे पाण्याखाली जातो, त्यामुळे अंधेरी पश्चिम ते पूर्वेकडे जाण्यासाठी हा नागरिकांना फिरून जावे लाग.ते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरीकांची गैरसोय होते.

Mumbai Rain Live Updates: मुंबई- ठाण्यात पावसाची बॅटिंग! वाहतूक विस्कळीत, लोकल सेवेवर परिणाम

मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.  या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरु आहे.  पुढील तीन तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तसेच समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

सकाळी 8 ते सकाळी 11वाजेपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणे

पश्चिम उपनगरे
1. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय - ६७.३ मिमी
2. मलपा डोंगरी महानगरपालिका शाळा, अंधेरी - ६६.६ मिमी
3. नारियलवाडी महानगरपालिका शाळा, सांताक्रुझ- ६५.४ मिमी
4. के (पूर्व) विभाग (वॉर्ड) कार्यालय - ६५.२ मिमी 

पूर्व उपनगरे
१. एन विभाग (वॉर्ड) कार्यालय  - ५८.८ मिमी
२. टेंबीपाडा महानगरपालिका शाळा, भांडुप- ५७.८ मिमी
३. रमाबाई महानगरपालिका शाळा, घाटकोपर- ५३.४ मिमी
४. पासपोळी पवई महानगरपालिका शाळा, पवई- ५२.६ मिमी
५. बांधकाम प्रस्ताव कार्यालय, विक्रोळी (पूर्व)  - ५१.८ मिमी

शहर
१. प्रतिक्षानगर महानगरपालिका शाळा, शीव (सायन) - ३०.२ मिमी
२. रावळी कॅम्प  - २२.३५ मिमी

Weather Today: मुंबई, पुणे, ठाणे, पालघरमध्ये पुढील 3-4 तास मुसळधार पाऊस, IMD चा इशारा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com