Mumbai School Holiday : मुंबईतील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर; कार्यालयांनाही मिळणार का?

Mumbai School College Closed : मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्याशिवाय अनेक रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai School College Closed due to heavy rain : राज्यभरात पावसाचा जोर वाढत आहे. मुंबईत हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्याशिवाय अनेक रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील दुसऱ्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून सकाळच्या सत्रात शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप घरी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Mumbai School Closed)

शाळांबरोबर महाविद्यालयांनाही (Mumbai School College Closed ) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुपारच्या सत्रातील मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील कार्यालयांनाही लवकर सोडणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र अद्याप तरी यासंदर्भातील माहिती मिळू शकलेली नाही.  

भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज (दिनांक 18 ऑगस्ट 2025) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी 12 वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सोमवार, दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

नक्की वाचा - Mumbai Rains Live Updates: मुंबईकरांसाठी पुढील चार तास धोक्याचे! अतिमुसळधार पावसाचा इशारा

काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी आणि अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात येत आहे.

Advertisement