Mumbai Best Bus Accident : मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहासमोर एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या अपघातात एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला धडक दिली. बस आणि कारमध्ये चिरडून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ही महिला मॉर्निंग वॉकला निघाली होती. त्यादरम्यान हा अपघात घडला. महिलेला तातडीने जे जे रुग्णालयात हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मलबार हिल परिसरात झालेल्या अपघाताची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्याची तपास केला. या अपघातात नीता शहा या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बेस्ट बस आणि स्कोडा या कारमध्ये चिरडून मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे.