जाहिरात

नवी मुंबईत ड्रग्ज विक्रीचा सुळसुळाट! आंतरराज्यीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश, मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात

नवी मुंबईत अंमली पदार्थांच्या विक्रीचा प्रश्न गंभीर बनला असून नवी मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आंतरराज्यीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

नवी मुंबईत ड्रग्ज विक्रीचा सुळसुळाट! आंतरराज्यीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश, मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात
Navi Mumbai Drug Case
मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी 

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत अंमली पदार्थांच्या विक्रीचा प्रश्न गंभीर बनला असून नवी मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आंतरराज्यीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. तळोजा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून आतापर्यंत एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसच 1 कोटी 19 लाख 13 हजार 500 रुपयांचा अमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पंजाब राज्यातून ट्रक चालकांच्या माध्यमातून आरोपी हेरॉईन व अफू (अफिम) अमली पदार्थ नवी मुंबईत आणून विविध भागांमध्ये विक्री करत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. विशेषतः तरुण पिढीला लक्ष्य करून या अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचंही समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुलमित सिंग दलविरसिंग रंधावा उर्फ फौजी याला अटक केली आहे.  

सनी रंधावा आणि विकी रंधावा यांनाही अटक

अमली पदार्थ विरोधी कक्ष,गुन्हे शाखा,नवी मुंबई पोलिसांकडून हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच गुन्ह्यात त्याची दोन मुले सनी रंधावा आणि विकी रंधावा यांनाही यापूर्वी अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या कारवाईमुळे आंतरराज्यीय ड्रग रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले असून अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

नक्की वाचा >> Shocking News: दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळलं, 1 महिन्यानंतर घडलं सर्वात भयंकर, दोन मुलं..

तरुणाई धोक्यात; जनजागृतीची गरज

नवी मुंबईसारख्या विकसित शहरात अमली पदार्थांची विक्री वाढणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ड्रग्जच्या व्यसनामुळे  तरुणांचे आरोग्य,करिअर आणि कुटुंबीयांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.अनेक गुन्हे,अपघात आणि आत्महत्यांमागे अमली पदार्थांचे सेवन कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई पोलिसांनी केलं मोठं आवाहन

नागरिकांनी आपल्या परिसरात अमली पदार्थांची विक्री,संशयास्पद हालचाली किंवा तरुणांमध्ये ड्रग्सचा वापर आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा अमली पदार्थ विरोधी कक्षाशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल,असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नक्की वाचा >> राज्यभरात या लग्नाची चर्चा! फक्त 150 रुपयांत पार पडलं माजी आमदार कन्येचं लग्न, नवरा-नवरीने घेतला मोठा निर्णय

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com