जाहिरात
6 months ago

Mumbai Rain Updates: मुंबईसह राज्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.   

Kolhapur Kagal Heavy Rain | कोल्हापुरातील कागल तालुक्यात मुसळधार, ओढ्याच्या पाण्यात म्हैस गेली वाहून 

पावसामुळे पुण्यात 55 ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटनांची नोंद

22 ठिकाणी साचले पावसाचे पाणी

एका ठिकाणी भिंत कोसळल्याची घटना 

मनसे विद्यार्थी सेनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे यांचे भर पावसात लागले लग्न

भंडारा: मान्सून पूर्व पावसाचा धान उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना जबर फटका

लाखांदूर कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये हजारो क्विंटल धान्य पावसात भिजले.

रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 46.10 मिलीमीटर पावसाची नोंद 

गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये 50 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद 

रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट 

मुंबईत मान्सून दाखल, भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा 

यंदा दोन दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल 

पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गाला फटका, महामार्गावर आणखी एका ठिकाणी मोरी खचली, महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा स्थानिकांचा आरोप  

सोलापूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची दमदार हजेरी, पापरी गावात पूरजन्य परिस्थिती

पालघर - मोखाडा तालुक्यात वादळीवारे आणि पावसाचा धुमाकूळ, वीज पडून 8 जनावरांचा जागीच मृत्यू

तळ कोकणात पेरणीच्या कामाला सुरुवात, सिंधुदुर्गमध्ये मृग नक्षत्रानंतर भात पेरणीला सुरुवात होते. 

जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्रान परिसरात वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान 

घरांच्या पडझडीसह लिंबू-केळी-पेरू-मोसंबीच्या फळबागांना फटका  

- कोल्हापुरात पावसाचा तीन दिवस ऑरेंज अलर्ट 

- कागल तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस 

पंढरपूरसह सांगोला तालुक्यात पावसाची दमदार हजेरी. दोन दिवसापूर्वी पंढरपूरमध्ये 131 मिमी पावसाची नोंद. 

नंदुरबार : पावसामुळे शहरातील रस्ते खड्डेमय, अपघातांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष.

वादळामुळे केळीच्या पिकांचे मोठे नुकसान  

Mumbai Goa Highway Landslide Video मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळतानाचे काळजाचा ठोका चुकवणारे दृश्य

मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी दरडी किंवा रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे. या ठिकाणी संरक्षण भिंतीचं काम सुरू आहे. मात्र हे काम सध्या अर्धवट स्थितीत आहे. हे काम वेळीच पूर्ण झालं नाही तर या ठिकाणी पावसाळ्यात रस्ता खचून वाहतूक ठप्प होण्याची भिती आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे काम वेळीच पूर्ण करून खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रवाशांनी देखील  सतर्क राहून प्रवास करणे आवश्यक आहे.  

हिंगोली जिल्ह्यामध्ये शनिवारी (8 जून) मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. मस्तानशहा नगरातून वाहणाऱ्या नाल्याला पुराचे रूप आल्यान अनेकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरले. अनेकांवर रात्र जागून काढण्याची वेळ. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हिंगोली नगरपालिकेने नाले सफाईची मोहीम राबवण्यास केली सुरुवात 

- पहिल्याच पावसामध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्ग खचला

- वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील जे. के. टायर शोरूम परिसराजवळ पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असल्याने महामार्ग खचल्याची माहिती

- खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण 

- पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

-मराठवाड्यातही आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता 

- विदर्भामध्ये वादळी वाऱ्यांसह सर्वत्र पावसाची शक्यता, संपूर्ण विदर्भासाठी आज यलो अलर्ट

- कोकणामध्ये सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता, सरासरी 50-60 ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.  

- रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, अलर्टनुसार काही ठिकाणी 100 मिमीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता 

- सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे, काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा 

- कोकणामध्ये सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता, सरासरी 50-60 ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.  

- रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, अलर्टनुसार काही ठिकाणी 100 मिमीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता 

- सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे, काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा 

पुण्यामध्ये मागील 24 तासांमध्ये 117.1 मिमी पावसाची नोंद 

मध्य रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने

अंबरनाथ स्टेशनदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता

मध्य रेल्वेकडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आल्याची माहिती

मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. 9 जून ते 11 जूनदरम्यान मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही भागांमध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com