रिझवान शेख, ठाणे:
Sahar Shaikh Cast certificate: ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 ची नगरसेविका सहर शेख या जोरदार चर्चेत आल्या होत्या. विजयानंतर कैसा हराया हा त्यांचा डायलॉग प्रचंड गाजला. मात्र आता सहर शेख यांचे नगरसेवकपद अडचणीत आले असून सहर शेखच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत असतानाच आता सहर शेख आणि तिचे वडील दोघेही नॉटरिचेबल असल्याचे समोर आले आहे.
Malad News: बकऱ्याचं काळीज, कोंबडी अन् दारु.. मालाडमधील रिधमबाबाचा भयंकर प्रताप; धक्कादायक VIDEO
सहर शेख नॉटरिचेबल!
कैसा हराया' या डायलॉगमुळे प्रसिद्धीझोतात आलेली आणि मुंब्रा प्रभाग क्रमांक ३० ची एमआयएम (MIM) नगरसेविका सहर शेख सध्या कायदेशीर पेचात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आल्याने शेख कुटुंबीय सध्या 'नॉट रिचेबल' झाले आहेत. मुंब्र्यातून ते गायब झाल्याची चर्चा असून या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.
प्रभाग ३० मधून निवडणूक लढवणाऱ्या सहर शेख यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या उमेदवार सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी तक्रार दाखल केली होती. युनूस शेख यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी जात वैधता पडताळणी समितीचा अहवाल लवकरच येणे अपेक्षित असतानाच सहर शेख आणि त्यांचे वडील मुंब्र्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी शेख कुटुंबाने कमालीची गुप्तता पाळली असून, समितीचा निर्णय विरोधात गेल्यास सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात ओढावलं संकट; BMC मोठा निर्णय घेणार?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world