महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न सुरू आहेत. यंदाच्या निवडणुकीत मराठा आणि ओबीसी समाजासह मुस्लीम मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑल इंडिया एकता फोरमने या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे. मुस्लीम धर्मगुरुंनी याबाबत घोषणा केली.
नक्की वाचा - तुतारी पिपाणी कन्फ्युजनवर उल्हासनगरच्या उमेदवाराची नामी शक्कल; मतविभाजनाची डोकेदुखी टळली!
मुस्लीम धर्मगुरू मौलाना खलील उररहमान सज्जाद नोमानी यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काही दिवसांपूर्वी संघटनेकडून महाविकास आघाडीला 17 मागण्यांचं पत्र पाठवण्यात आलं होतं. निवडणुकीत पाठिंबा हवा असेल तर या मागण्या मान्य कराव्या लागतील असं सांगण्यात आलं.
यानुसार, वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध, नोकऱ्या आणि शिक्षणात मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण, 2012-24 मध्ये दंगलीच्या आरोपात तुरुंगात असलेल्या निरपराध मुस्लिमांची सुटका करणं, राज्यातील 48 जिल्ह्यात मशीद, दर्गा आणि स्मशानभूमीचं सर्वेक्षण आणि महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.