मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप केला जात होता, मात्र आता पोलिसांनी त्यांचा अहवाल काल उच्च न्यायलयात दाखल केला. त्या अहवालात आदित्य ठाकरे यांचं विरोधात कुठलाही पुरावा सापडला नाही असं स्पष्ट नमूद केलं आहे. मात्र या सगळ्या अहवालानंतर सत्ताधारी आमदार आदित्य ठाकरेंच्या मदतीसाठी धावून आले आहेत.
जाणूनबुजून केलेले आरोप....
राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आदित्य ठाकरेंना समर्थन दर्शवलं आहे. एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, "आदित्य ठाकरे वारंवार बोलत होते कि मी निर्दोष आहे मात्र त्यांच्यावर जाणूनबुजून आरोप केले जात होते. केवळ राजकीय सूडापोटी हे आरोप केले गेले होते...वयक्तिक बदमानी त्यांची केली गेली आणि केवळ वयक्तिक राग त्यांच्यावर काढला गेला ते निर्दोष आहेत," असं परखड मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं आहे.
राणेंनी माफी मागावी....
"भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे हे वारंवार आदित्य ठाकरेंवर आरोप करत होते, मात्र आता पुरावा सापडला नसल्याने त्यांची माफी राणेंनी मागावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी केली आहे. ठाकरे कुटुंबाची बदनामी केली गेली आता नैतिकतेच्या आधारावर राणेंनी माफी मागावी," अशी मागणी सचिन अहिर यांनी केली आहे.
दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी एनडीटीव्ही मराठीशी या विषयी बातचीत करताना त्यांनी ठाकरेंवर आरोप केले आहेत. दिशा सालियनची हत्या झाली तेव्हा सरकार ठाकरेंचं होत आणि त्यामुळे सहज रित्या त्यांनी सर्व पुरावे नष्ट केल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. दिशाचे वडील खरं बोलत आहेत आणि आदित्य ठाकरेचं दोषी असल्याची टीका देखील त्यांनी केली.