Nagpanchami 2025 : यंदा नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करता येणार? सांगलीतील गावकऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांकडे धाव  

सांगली जिल्ह्यातील (Sangli News) शिराळा येथे इसवीसन पूर्व 700 वर्षांपूर्वीपासून नागपंचमीनिमित्ताने जिवंत नागाची पूजा केली जाते.

जाहिरात
Read Time: 2 mins

गेल्या काही वर्षापासून खंडीत झालेली जिवंत नागाच्या (Nagpanchami 2025) पूजेची परवानगी मिळावी अशी मागणी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळकर ग्रामस्थांकडून केली जात आहे. हीच मागणी घेऊन जिवंत नागाच्या पूजेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 32 शिराळा (32 Shirala) येथील ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या महिन्याच्या शेवटी 29 जुलै रोजी नागपंचमीचा सण आहे. यासाठी शिराळा शहरातील सर्व नागराज मंडळांनी केंद्रीय वनमंत्र्यांकडे रीतसर मागणी केली आहे. फक्त पूजेकरिता जिवंत नागाची परवानगी मिळावी यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांकडे अपील करण्यात आलं आहे. 

सांगली जिल्ह्यातील (Sangli News) शिराळा येथे इसवीसन पूर्व 700 वर्षांपूर्वीपासून नागपंचमीनिमित्ताने जिवंत नागाची पूजा केली जाते. शिराळा गावाची ही गेल्या शेकडो वर्षापासूनची परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून या गावात नागपंचमी दिवशी जिवंत नागाची पूजा करतात.  जिवंत नागाची पूजा करूनच शिराळकर ग्रामस्थ आपली नागपंचमी साजरी करतात.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Ashadhi Ekadashi 2025: 'दर्शन देरे...', भाविकांची रांग गोपाळपूरपर्यंत; एकादशीपूर्वीच विठ्ठल दर्शनासाठी 15 तासांचा कालावधी

मात्र अलीकडे वन्यप्राणी कायद्याच्या अंतर्गत करण्यात आलेल्या सुधारित कायद्यानुसार जिवंत नागावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शिराळकर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. गेल्या काही वर्षापासून जिवंत नागावर बंदी असल्याने शिराळकर प्रतीकात्मक नागाची नागपंचमी दिवशी पूजा करत आहेत. किमान नागपंचमी दिवशी पूजा करण्याकरिता जिवंत नागाची परवानगी मिळावी यासाठी शिराळकर नागरिकांचा लढा सुरू आहे. सध्या जिवंत नागाच्या पूजेबाबत परवानगी देणारे निवेदन केंद्रीय वनमंत्र्यांच्याकडे प्रलंबित आहे. त्यामुळे वनमंत्र्यांच्या समोर याबाबतची सुनावणी होणार आहे. यासाठी या सुनावणीकडे संपूर्ण शिराळकरांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे यंदा तरी जिवंत नागाची पूजा करण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा शिराळकर ग्रामस्थांना आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article