संजय तिवारी, प्रतिनिधी
Nagpur Blast नागपूरजवळ धामणामध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीच्या साईटवर स्फोट होऊन आग लागल्याची माहिती आहे. या घटनेत दोन जण ठार तर सात जण जखमी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. धामणामधील चामुंडा कंपनीत हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटातील जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
डोंबिवली एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स कंपनीत बुधवारी आग लागली होती. त्यापूर्वी 23 मे रोजी डोंबिवलीच्याच MIDC फेज-2मधील अमुदान कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू तर 55 जण जखमी झाले होते. त्यापाठोपाठ नागपूरमध्ये ही घटना घडली आहे.
या प्रकरणाची माहिती समजताच अग्निशमन दल तसंच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. स्फोटकांची कंपनी असल्यानं आग विझवण्यात विशेष खबरदारी घेतली जात आहे.
#WATCH | Nagpur: At least 5 people have died and 5 people are injured in an explosion at an explosives manufacturing factory in Dhamna. The team is about to reach the spot: Commissioner of Police, Nagpur
— ANI (@ANI) June 13, 2024
More details awaited.
NCP-SCP leader Anil Deshmukh present at the spot pic.twitter.com/uZkhra6ZXX
या स्फोटाचं वृत्त समजताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख घटनास्थळी दाखल झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world