Haldiram Fraud: हल्दिराम कंपनीच्या मालकांना लुटलं! कशी झाली साडे 9 कोटींची फसवणूक? वाचा सविस्तर

Fraud With Haldiram Company owner: कंपनीचे मालक कमल अग्रवाल यांना गुंतवणुकीच्या बदल्यात कंपनीतील 76 टक्के शेअर्स देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Haldiram Group Fraud News: मिठाई, ड्रायफ्रूट्स आणि खाद्यपदार्थांतील आंतरराष्ट्रीय ब्रँड – हल्दिराम. नुकतेच नागपूर आणि नवी दिल्ली येथील अग्रवाल कुटुंबियांच्या दोन हल्दिराम कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले. या नव्या हल्दिराम कंपनीचे व्हॅल्युएशन तब्बल 84 हजार कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहे. मात्र, याच कंपनीचे मालक कमल अग्रवाल यांना गुंतवणुकीच्या बदल्यात कंपनीतील 76 टक्के शेअर्स देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Digital Arrest Fraud: विश्वास नांगरे पाटलांचे AI, 'डिजिटल अरेस्ट'चा फास, वृद्ध दाम्पत्याचे 78 लाख लुटले

हल्दिराम ग्रुपच्या उपकंपनी ओम इंडस्ट्रीज लिमिटेडने ‘रॉयल ड्रायफ्रूट प्रायव्हेट लिमिटेड'मधील शेअर्स विकत घेतले. लालानी दाम्पत्याने ‘रॉयल ड्रायफ्रूट प्रायव्हेट लिमिटेड'मधील 76 टक्के शेअर्स देण्याचे आश्वासन दिले होते. समीर अब्दुल हुसेन लालानी, त्यांची पत्नी हिना लालानी, मुलगा आलिशान लालानी आणि प्रकाश भोसले यांनी विविध सबबी सांगून कमल अग्रवाल यांना संभाषणात गुंतवले. त्यानंतर हल्दिराम कंपनीसोबत पुन्हा करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सप्टेंबर 2023 पर्यंत, कमल अग्रवाल यांच्या कंपनीने एकूण 9 कोटी 38 लाख 59 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती.

यानंतरही कमल अग्रवाल यांना ना नफा मिळाला ना शेअर्स, त्यामुळे त्यांना संशय आला. हल्दिराम कंपनीने आरोपींच्या कंपनीची चौकशी केली असता, बनावट कागदपत्रांच्या आधारे वार्षिक उलाढाल, नफा आदी गोष्टी अतिशयोक्तीपूर्ण दाखवण्यात आल्याचे उघड झाले. इथूनच वाद सुरू झाला. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर लालानी दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा फरार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Dating App Scam: डेटिंग अ‍ॅपवरचा नाद नडला; WhatsApp वर गोड बोलून वृद्धाची 73.72 लाखांची फसवणूक

आरोपी कंपनीविरोधात विविध सरकारी यंत्रणांकडे आर्थिक चौकशा प्रलंबित असल्याचे पोलिस तपासात आढळून आले. गुंतवणुकीच्या नावाखाली इतर अनेकांची फसवणूक झाल्याची माहितीही पोलिसांनी मिळवली आहे. अशा प्रकरणांमध्ये आरोपी अनेक बोगस कंपन्या स्थापन करून त्यामध्ये बनावट उलाढाल दाखवतात, आणि त्यामुळे उद्योजकांची फसवणूक होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या प्रकरणात कळमना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपी फरार आहेत.

Advertisement