जाहिरात

Digital Arrest Fraud: विश्वास नांगरे पाटलांचे AI, 'डिजिटल अरेस्ट'चा फास, वृद्ध दाम्पत्याचे 78 लाख लुटले

Chhatrapati Sambhajinagar Digital Arrest Fraud:सेवानिवृत्त अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट करत तब्बल 78 लाख रुपये उकळल्याची घटना घडली आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? वाचा..

Digital Arrest Fraud: विश्वास नांगरे पाटलांचे AI, 'डिजिटल अरेस्ट'चा फास, वृद्ध दाम्पत्याचे 78 लाख लुटले

Chhatrapati Sambhajinagar Digital Arrest Fraud: सायबर क्राइमचा धोका दिवसेंदिवस वाढत असून डिजिटल अरेस्टची भिती दाखवून लाखो रुपये उकळल्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. असाच धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट करत तब्बल 78 लाख रुपये उकळल्याची घटना घडली आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? वाचा...

Dating App Scam: डेटिंग अ‍ॅपवरचा नाद नडला; WhatsApp वर गोड बोलून वृद्धाची 73.72 लाखांची फसवणूक

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यात २० लाख जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी ६ दिवस डिजिटल अरेस्ट करत तब्बल 78 लाख 60 हजारांना लुटले.

धक्कादायक बाब म्हणजे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील  (IPS Vishwas Nangare Patil) यांच्यासारख्या दिसणाऱ्या AI निर्मित व्यक्तीरेखा वापरुन व्हिडीओ कॉल करून वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील विश्वास नागरे पाटील यांच्या नावाने अशाच पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे.

कसा घडला प्रकार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगरमधील या वृद्ध दांपत्याला एक फोन आला होता. फोनवरुन त्यांना तुमच्या बँक खात्यातून संशयास्पदरित्या पैसे ट्रान्सफर झाल्याचे सांगण्यात आले. त्याबद्दल तुम्हाला अरेस्ट होऊ शकते, असंही सांगण्यात आले. याप्रकरणी दांपत्याकडून सायबर चोरट्यांनी पैशांची मागणी केली. घाबरलेल्या दांपत्याने त्यांना जवळपास 78 लाखांची रक्कम पाठवली.

Mobile Loan Fraud: ऑनलाईन लोन घेत असाल तर सावधान! महिलांचे मॉर्फ केलेले नग्न फोटो वापरुन 'कर्जलूट'

2 जुलै ते 7 जुलैपर्यंत हा सगळा प्रकार सुरु होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून कधीही अशा प्रकारचे कॉल केले जात नाहीत, डीजिटल अरेस्टचे कारण सांगून पैसे मागितले जात नाहीत, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांना बळी पडू नये असे आवाहन डीसीपी प्रशांत स्वामी यांनी केले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com