Nagpur Crime: किरकोळ धक्का लागल्याचे निमित्त, 5 जणांनी तरुणाला घेरलं, पुढं जे घडलं ते भयंकर...

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तुषार मेश्राम, गणेश मांडले आणि अर्पित हेमने यांचा समावेश आहे. या आरोपींचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याची माहितीही समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur News:  नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने अचानक हिंसक वळण घेतले. गंगाबाई घाट चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील एका भोजनालयात ही घटना घडली, जिथे काही तरुणांनी मिळून एका व्यक्तीवर शस्त्रांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Satara News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कॅमेऱ्यात 'ब्लॅक पँथर', दुर्मीळ दृश्य; बिबट्या असूनही रंग काळा का?

समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात सध्या हॉटेल आणि बारमध्ये होणाऱ्या भांडणांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या क्राईम मीटिंगमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व ठाणेदारांना नियमित गस्त घालण्याचे आणि हॉटेल-बारच्या वेळेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, यादरम्यान लकडगंजमधील लोकप्रिय 'पिंटू सावजी' हॉटेलमध्ये सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान रस्त्यावरील हाणामारीत झाले.

Advertisement

 पीडित वैभव ईटनकर हा भोजनालयात जेवण्यासाठी गेला होता आणि काउंटरवर ऑर्डर देत होता. त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाला त्याचा हलकासा धक्का लागला. या शुल्लक कारणावरून वादाला सुरुवात झाली आणि त्याचे रूपांतर शिवीगाळीत झाले. वाद विकोपाला गेल्यावर आरोपींनी रस्त्यावरील दगड उचलून वैभवच्या डोक्यावर प्रहार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

या घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी वैभवला रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आणि गुन्हा दाखल करून एका अल्पवयीन मुलासह चार जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तुषार मेश्राम, गणेश मांडले आणि अर्पित हेमने यांचा समावेश आहे. या आरोपींचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याची माहितीही समोर आली आहे.

नक्की वाचा - Satara News : साताऱ्याचं चित्र बदलणार! मंत्रिमंडळाच्या एका निर्णयामुळे मुंबई-पुण्यात जाण्याची गरज संपणार...

Topics mentioned in this article